बालदिन साजरा करताना विद्यार्थी
बारामती :
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या “बालदिनाचे”औचित्य साधून झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूल बारामती व कटफळ या शाळेमध्ये लहान मुलांसोबत आनंद उत्सव साजरा केला. यामध्ये पहिली ते दहावीच्या वर्गातील मुलांनीही या उपक्रमाचा आनंद घेतला. या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी रायफलशूटिंग, घोडेस्वारी, मेहंदी,मनोरंजनात्मक तसेच इलेक्ट्रॉनिक खेळ आदी. खेळांचे आयोजन करून यशस्वी क्रमांकांना बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहभाग घेत मनमुराद आनंद लुटून बालदिनाला रंगत आणली.व यावेळी अशा विविध कार्याचा आढावा घेत शाळेच्या प्राचार्या. इन्सिया नासिकवाला यांनी समाज व देश घडविण्याचा विचार बळकट करण्याची गरज असल्याचे सांगितले.