बारामती :
बारामती तालुका जिजाऊ सेवा संघाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमीत्त व बालदिन
निमीत्त ( सोमवार 14 नोव्हेंबर 2022) फुटपाथ वरील अनाथ मुलांना,ऊसतोड कामगाराची मुले रस्त्याच्या कडेला पाल टाकून व्यवसाय करणाऱ्या च्या मुलांना व गरजू मुलांना थंडी पासून बचाव होण्यासाठी स्वेटर, ब्लॅंकेट्, रग व महिलांसाठी साड्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे व विश्वस्त, छायाताई कदम, जिजाऊ सेवा संघ अध्यक्षा हेमलता परकाळे,उपाध्यक्ष स्वाती ढवाण,कार्याध्यक्ष सुनंदा जगताप,उपकार्यध्याक्षा प्रतिभा बर्गे खजिनदार संगीता शिरोळे, सहखजिनदार अर्चना परकाळे, सचिव ज्योती खलाटे, सदस्या वंदना जाधव व सुवर्णा केसकर.
आदी मान्यवर उपस्तित होते.
आभार हेमलता परकाळे यांनी मानले.