सातारा दि १७ :
शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय मैदानी स्पर्धा २०२२ चे आयोजन साविञीबाई फुले महिला महाविद्यालय , सातारा द्वारा छञपती शाहू क्रीडा संकुल सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा विभागातील एकुण ४३ महाविद्यालयाच्या सुमारे १५६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख मा.डाँ. शरद बनसोडे व अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री .युवराज नाईक हे लाभले. यावेळी सातारा विभागातील विविध महाविद्यालयाचे स्पर्धेसाठी आलेले शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते. या स्पर्धेत श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडचे खेळाडू यांनी उत्तम कामगिरी केली.यामधे १५०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात कु. दादा शिंगाडे याने प्रथम क्रमांक व कु. रुपाली हिने सावंत द्वितीय क्रमांक मिळवून राजे रामराव महाविद्यालय ,जत( सांगली) या ठिकाणी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ, आंतर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी पाञता मिळविली.तसेच १०,००० मी.धावणे या क्रीडा प्रकारात कु. आरती बाबर हिने तृतीय क्रमांक व ८०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात कु.रुपाली सावंत हिने द्वितीय क्रमांक मिळविला.या दोन्ही खेळाडूंचे आंतर विद्यापीठ , मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच ८०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात कु.कल्याणी बाबर हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. या यशस्वी खेळाडूंना प्रा. प्रिंयका खांडेकर व प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.
या यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ.ए. सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,फ.ए.सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी मा. श्री . अरविंद निकम, अधिक्षक मा.श्री.श्रीकांत फडतरे , महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. एस.टी. कदम , आणि प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.