कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार

फलटण प्रतिनिधी :
 संपुर्ण महाराष्ट्रासह ईतर राज्यात पसरलेला कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या बोगस शेअर कंपनीचा घोटाळा लवकरच उघडा पडणार असून यात बोगस कंपनी सह फलटण तालुक्यासह ईतर जिल्ह्यातील एजंट व गुंतवणूकदार यांची चौकशी येणाऱ्या काही दिवसात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील दोन वर्षात अनेक लोकांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. अशा लोकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन त्यांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जात आहे.राज्यासह फलटण तालुक्यात विविध भागात विविध प्रलोभने देऊन पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एका बोगस कंपनीने फलटण तालुक्यातील काही एजंट लोकांना हाताशी धरून मोठया प्रमाणावर कमिशन देऊन कोट्यवधी रकमेची आर्थिक लूट करत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांची फसवणूक झाली आहे. 

पैसे दुप्पट होतील या अपेक्षेने व्यापारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, महिला वर्ग लोक पैसे गुंतवण्यासाठी पुढे येतात. त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना लुटले जात आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जाते व लोकांना लुटले जाते. यासाठी बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या बोगस कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपून कंपन्यांचे संचालक मालामाल झाले आहेत.

यापूर्वी अशाच  काही प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर दोन कंपन्यांच्या संचालकांना अटक झाली आहे, कोट्यवधीच्या रक्कमेचा घोटाळा असणाऱ्या शेअर मार्केट घोटाळ्याची पाळेमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरली आहेत. शेजारच्याच तालुक्यात सुरू झालेल्या शेअर मार्केटमधील बोगस कंपन्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी लवकरच विवीध शासकीय विभाग व मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

अशा बोगस कंपन्यांवर कारवाईची मागणी होणार असून कथित शेअर मार्केट घोटाळ्यातील बोगस कंपन्यांचे सर्व व्यवहार तपासून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, तसेच कंपन्यांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही केली जाणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) रितसर तक्रार दाखल झाल्यास या कथित घोटाळ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या घोटाळेखोरांचे धाबे दणाणले जाणार आहेत. 

अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी या या कंपनीत एजंट व गुंतवणूकदार म्हणून सामील असून नियमानुसार बोगस कंपन्यांत कोणत्याही प्रकारे शासनाचे पूर्वपरवानगी न घेता काम करता येत नाही अथवा गुंतवणूक करता येत नाही असे असताना फलटण तालुक्यातील अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी अशा बोगस शेअर्स कंपन्यांमध्ये एजन्सी कामे करत आहेत व बक्कळ कमिशन कमवत आहेत तसेच अनेक जण लाखोंची गुंतवणूक करत आहेत पुढील काळात संबंधित तक्रार दाखल झाल्यास अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याचे बोलले जात आहे.



चौकट 1
या प्रकरणात बोगस कंपन्यांच्या संचालकासह एजंट यांच्यासोबत गुंतवणूक करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे कारण अशा गुंतवणूक करणाऱ्या लोकांमुळेच अशा कंपन्यांची उलाढाल कोट्यावधी रुपयांत पोहचत आहे.


चौकट 2
फलटण तालुक्यातील एका मोठ्या कंपनीतील ६० ते ७० टक्के कर्मचाऱ्यानी या बोगस कंपनीत कोट्यवधीची गुतवणुक केली असून याची ही चौकशी होण्याची आवश्यकता आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!