फलटण ( फलटण टुडे) :
महाराष्ट्र माळी समाज महासंघ,तसेच महामित्र पाक्षिक परिवार याच्या वतीने रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत महाराजा मंगल कार्यालय, रिंग रोड, फलटण, जि.सातारा येथे राज्यव्यापी माळी समाज वधू-वर पालक परिचय मेळाचे आयोजन करण्यात आला असल्याचे मेळाव्याचे संयोजक दशरथ फुले यांनी सांगितले.
गेल्या ३१ वर्षापासुन महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने फलटण या ठिकाणी दर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते परंतु गेल्या दोन वर्षात करोनाच्या पार्श्वभूमी मुळे मेळावा आयोजित करता आला नाही त्यामुळे या वर्षीचा वधु-वर मेळावा १३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित केला आहे
गेल्या ३१ वर्षात फलटण येथे होणार्या मेळाव्याचा लाभ राज्यातील अनेक वधु-वरांनी व त्याच्या पालकांनी घेतला असुन या मेळाव्याच्या माध्यमातुन पाच हजाराहुन अधिक विवाह जुळून आले आहेत, पालक वर्गाचा मोठ्या प्रमाणात आपआपसात परिचय वाढला आहे. या वधु-वर परिचय मेळाव्यामुळे फलटण तालुक्यामध्ये सामाजिक संघटनेस गती व बळकटी मिळाली असुन आज फलटण हे राज्यातील वधु-वर मेळाव्याचे केंद्र बनले आहे.
फलटण येथील मेळाव्याची प्रेरणा घेऊन राज्यात अनेक ठिकाणी मेळावे घेतले जात आहे व त्याचा फायदा वधु-वरांना व त्याच्या पालकांना होत आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी फलटण या ठिकाणी भेटी देऊन मेळाव्याचे उद्घाटन केले असुन या हि वर्षी मान्यवरांना निमंत्रित करून त्याचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तरी या मेळाव्याचा लाभ माळी समाजातील प्रथम वधु-वरांनी तसेच विधवा, विधूर, घटस्फोटीत, वधु-वरांनी घ्यावा असे आव्हान संयोजकानी केले आहे.