हिंगोली ( फलटण टुडे वृत्तसेवा) :
५८ व्या पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२२-२३ चे उद्घाटन शनिवार दि.५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी अर्जुन पुरस्कारप्राप्त काकासाहेब पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा उद्घाटना अगोदर हिंगोली शहरात भव्य शोभायात्रा व क्रीडा ज्योत दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरातुन काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित पुरुष व महिला राज्य अंजिक्यपद व निवडचाचणी खो-खो स्पर्धेची सुरुवात शनिवार दि.५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने राज्यभरातील खेळांडु तसेच स्थानिक खेळांडु, नागरिक, क्रीडा प्रेमी व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरातुन क्रीडा ज्योत व शोभा यात्रा शनिवार दि.५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता काढण्यात येणार आहे. हि शोभायात्रा पोस्ट ऑफिस रोड, जवाहर रोड, महात्मा गांधी पुतळा, इंदिरा गांधी पुताळा व रामलिला मैदान येथे समारोप होणार आहे. यानंतर स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी अर्जुन पुरस्कारप्राप्त काकासाहेब पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन खा.हेमंत पाटील, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, आ.राजु भैय्या नवघरे, आ.विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.डॉ.प्रज्ञाताई सातव, आ.विप्लव बाजोरिया, माजी खा.ऍड.शिवाजी माने, माजी खा.सुभाष वानखेडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ.रामराव वडकुते, माजी आ.संतोष टारफे, माजी आ.गजानन घुगे, माजी आ.दगडुजी गलांडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजेश उर्फ भैय्या पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, तहसीलदार नवनाथ वगवाड, मुख्याधिकारी अरंविद मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे, ऑल इंडिया खो-खो असोसिएशनचे सहसचिव चंद्रजित जाधव, सचिव गोंविद शर्मा, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित प्रा.उत्तमराव इंगळे, परभणी जिल्हा खो-खो असोसिएशनचे संतोष सावंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेची तयारी पुर्ण झाली असुन हिंगोली शहरात राज्यातील ४८ संघ दाखल झाले आहेत. या स्पर्धेकरिता दिड हजार खेळांडु, पंच, पदाधिकारी शहरात आले आहेत. त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था व वाहतुक व्यवस्था नियोजनबद्ध करण्यात आली आहे. रामलिला मैदानावर भव्य प्रागंणात डे-नाईट खो-खो स्पर्धा सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत तर दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत होणार आहेत. दुपारी चार वाजता छत्रपती शिवरायांना वंदन करुन शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेत बॅण्ड पथक, देखावा, घोडे, रथ यासह खेळांडु क्रीडा प्रेमी नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी होणार आहेत. अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्या शुभहस्ते क्रीडा प्रज्योलित करुन भव्य शोभा यात्रा निघणार आहे. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व जिल्हा खो-खो असोसिएशन च्या पदाधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे. सर्व क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन व खो-खो स्पर्धा संयोजन समिती यांनी केले आहे.