फलटण तालुक्यातील कृषी पदवीधर संघटनेच्या वतीने आयोजित फलटण तालुक्यातील ज्येष्ठ व कनिष्ठ कृषी पदवीधरांमध्ये सुसंवाद साधून शेती, शेती संलग्न व्यवसाय व स्पर्धात्मकता निश्चित करण्यासाठी संघटनेची कायदेशीर नोंदणी करून मा.शेखर गायकवाड (IAS), साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटनां, कृषी महाविद्यालय पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटनेचे राज्य पातळीवरील AGRICON -23 नियोजित आहे, त्याची चर्चा करणे.तसेच आपल्यातील विशेष कर्तृत्ववान कृषी पदवीधरांना सन्मानित करणे या करीता दि.२३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वा अनंत मंगल कार्यालय कोळकी ता.फलटण येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमास जेष्ठ कृषी पदवीधर श्री. किशोर राजे निंबाळकर(IAS) अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, श्री.आनंद रायते(IAS) ,अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भूमापन महाराष्ट्र राज्य, श्री.पोपटराव मलिकनेर (IAS)सह मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ,श्री. अजित पवार (IAS)मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, श्री. अनिल कवडे(IAS) आयुक्त सहकार महाराष्ट्र राज्य, श्री. दौलत देसाई(IAS) माजी जिल्हाधिकारी कोल्हापूर, श्री.सुरेश जाधव (IAS)आयुक्त कामगार विभाग महाराष्ट्र राज्य, श्री. चिंतामणी जोशी(IAS) आयुक्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य, श्री.विश्वास भोसले माजी पशुसंवर्धन आयुक्त, श्री. एन डी चव्हाण (IPS)अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग पुणे, श्री. राजेंद्र सरकाळे मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा, श्री. प्रताप जाधव (IAS)उप महासंचालक यशोदा पुणे, हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी फलटण तालुक्यातील सर्व कृषी पदवीधरांना विनंती करण्यात येते की सदर मेळाव्यास आपण उपस्थित राहावे असे आवाहन फलटण तालुका कृषी पदवीधर संघटने कडून आवाहन करण्यात आले आहे.
फलटण येथे फलटण तालुका कृषी पदवीधर संघटनेचा मेळावा
फलटण टुडे :-