श्रीमंत भैय्यासाहेब राजमाने महाविद्यालय, म्हसवड येथे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर- यांच्या जीवन व कार्य” या विषयावर व्याख्यान देताना
प्रा. विशाल पितांबर मोरे
म्हसवड (फलटण टुडे ) : –
फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजमाने महाविद्यालय म्हसवड येथे लीड कॉलेज व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त” श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर- जीवन व कार्य” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून मधोजी महाविद्यालय फलटण येथील इतिहास विभागातील सहाय्यक प्रा. विशाल पितांबर मोरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमंत भैय्यासाहेब राजमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम संतोष तुकाराम यांनी भूषवले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इतिहास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रा. विशाल मोरे यांनी श्रीमंत मालोजीराजे यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व कृषी विषयक कार्याचा व्यवस्थितरित्या आढावा घेतला. तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कदम यांनी मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कार्याचे चिंतन करून आजच्या पिढीने कोणता वसा घेतला पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लिड कॉलेजचे प्रमुख प्रा. डॉ. जाधव, आयक्वँक प्रमुख प्रा. रणवरे, एन. एस. एस. चे प्रमुख प्रा. डॉ. कुलाळ उपस्थित होते याचबरोबर भुगोल विषयाचे प्रमुख डॉ. टिळेकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कु. चव्हाण मॅडम, प्रा. सावंत मॅडम, प्रा. डॉ. बोबडे, प्रा. बंडगर, प्रा. डॉ. मुल्ला मॅडम, प्रा. तांबोळी मॅडम, प्रा. सावंत, प्रा. चंदनशिवे, हेही उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. महेशकुमार सोनवणे तर प्रास्ताविक इतिहास विभागाचे विजय क्षिरसागर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. सौ.देशमुख सुजाता यांनी मानले.