सातारा जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांचा सत्कार करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , तुषार मोहिते व इतर मान्यवर
फलटण टुडे : –
कोविडमुळे क्रीडा क्षेत्रातील सर्वाची निराशा झाली होती परंतु आता परिस्थिती बदलल्याने सर्वानी जोमाने तयारी करुन राज्य व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करुयात असे प्रतिपादन सातारा जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी केले.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा फलटण तालुका नियोजन बैठक मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर काँलेज , फलटण येथे पार पडली .
यावेळी फलटण तालुक्यातील क्रीडा शिक्षक यांना मार्गदर्शन करीत असताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे प्रा. मनोहर यादव, कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष प्रा. आर.वाय .जाधव, मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर काँलेज प्राचार्य बाबासाहेब गंगवणे सर , फलटण तालुका शालेय क्रीडा स्पर्धा बैठक आयोजन समन्वक सचिन धुमाळ व फलटण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना पदाधिकारी आणि सदस्य तसेच फलटण तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन ठिकाणे ,स्पर्धा नियमावली , क्रीडा शिक्षक यांनी स्पर्धेसाठी करायची पुर्वतयारी या संदर्भात युवराज नाईक यांनी मार्गदर्शन केले.
तसेच खेळाडू यांची कागदपत्रे आँनलाईन पद्धतीने कशा प्रकारे भरावे यांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , सातारा वरिष्ठ लिपिक विनोद कुडवे यांनी सर्व माहिती देऊन क्रीडा शिक्षकांचे शंका समाधान केले.
सदर बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर कार्यक्रमाचे सूञसंचालन अजय कदम व आभार काशिनाथ सोनवलकर यांनी मानले