रुई मध्ये जय पाटील यांचा सत्कार
बारामती ( फलटण टुडे ) :
राष्ट्रवादी च्या माध्यमातून बारामती चा विकास झाल्याने देश पातळीवर गौरव होत असताना राष्ट्रवादी चे विचार तळागाळात पोहचविणार असून वार्ड तिथे शाखा उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.
प्रा अजिनाथ चौधर व रुई मधील नागरिकांच्या वतीने जय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी पाटील बोलत होते
या वेळी, शहर उपाध्यक्ष बाबासो चौधर, राघू चौधर, राहुल सोनने, मधुकर शिरसट,नवनाथ चौधर आदी मान्यवर उपस्तित होते.
राष्ट्रवादी च्या पाठीशी नेहमी रुईकर जनता उभी आहे एमआयडीसी व विद्या प्रतिष्ठान मुळे रुई चा विकास जलद गतीने झाला या पुढील काळात सुद्धा रुई कर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही प्रा अजिनाथ चौधर यांनी दिली.
या प्रसंगी सूत्रसंचालन काका थोरात यांनी केले आभार साईनाथ चौधर यांनी मानले