खटकेवस्ती येथील विविध विकास कामांचे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन


गोखळी ( फलटण टुडे) :

 फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती येथील विविध विकास कामांचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ.दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराचे खर्डेकर, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ उषादेवी गावडे उपस्थित होते.यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की,.’ आपल्या कडे शेतकरी ऊसाबरोब एक, दोन पांड मेथी घासा जनावरांसाठी करतात या मेथी घासा पासून बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याचे माझ्या डोक्यात आहे जसे . खुंटे नजिकच्या के. बी. एक्सपोर्ट कंपनीकडून भेंडी शेतकऱ्यांकडून घेऊन एक्सपोर्ट केली जाते त्या प्रमाणे एकमेकांची सांगड घालून मेथी घासा पासून बायोगॅस प्रकल्प शक्य आहे असे सांगुन श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, जलजीवन मिशन योजनेबाबत तालुक्यातील विरोधकांत कडून जो गैरसमज पसरवला जात आहे याविषयी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले ‘जलजीवन मिशन’ ही योजना आत्ताचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील हे मागच्या आघाडी सरकारमध्येही पाणीपुरवठा मंत्री होते त्यामुळे आपल्या तालुक्यातील ३०-४० लहान, मोठ्या गावात ‘जल जिवन मिशन’ योजनेची कामे सुरू आहेत ही योजना जरी केंद्रांची असली तरी त्याचा पाठपुरावा सरपंच व सहकाऱ्यांपासून जागा निश्चितीकरण,पाण्याचा सार्स शोधून प्रस्ताव करुन तालुका, जिल्हा पातळीवरुन राज्य सरकार कडून केंद्राकडे जाते .’जल जिवन मिशन ‘योजनेचे सर्व श्रेय आघाडी सरकारचे असलेल्याचे सांगुन श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले,शिवरुपराजे यांनी जिल्हा बँकेकडून सोसायटी यांना देण्यात यांना डिव्हिजन अकाऊंटवर जमा न करता रोखीने द्यावा अशी मागणी केली असता असता श्रीमंत रामराजे म्हणाले ७ तारखेला आम्ही निर्णय करू बँक जेव्हा निर्णय घेते तेव्हा जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातात तो सर्वांनी मान्य करावा. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जय तुळजाभवानी मंदिरात जावून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. नव्याने बांधण्यात आलेल्या १०४ घरकुलांपैकी बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे हस्ते ना. श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते चावी देऊन लाभार्थींना वितरण करण्यात आले नवीन मंजूर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात.यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराचे खर्डेकर म्हणाले यावर्षी याभागात कापसाची १७०० एकराच्या आसपास लागवड झालेली आहे. श्रीमंत रामराजे यांनी लक्ष घालून आसू येथील काळेश्वर कॉटन जिनिंग कापसाबावी अडचणीत येऊन बंद आहे. अडचणीत असणारा श्रीराम सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढला तसे आसू येथील बंद काळेश्वर कॉटन जिनिंग सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा मागणी केली. .,सरपंच बापूराव गावडे यांनी प्रास्ताविक केले यावेळी बोलताना ते म्हणाले, खडकी वस्ती येथे झालेली सर्व विकास कामे श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच मी करू शकलो फक्त दिड महिन्याच्या कालावधीत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पद काळात तालुक्यातील 450 लाभार्थीपैकी खटकेवस्ती येथील 100 लाभार्थींना मी न्याय देऊ शकलो खटकेवस्ती येथील मागासवर्गीय वस्ती साठी 32000 लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी , जल जिवन मिशन अंतर्गत पाईप लाईन, सिमेंट रस्त्याचे काम,भुमिगत गटार,गोसावी वस्ती, नंदीवाले वस्ती वॉल कंपाऊंड, वळकुंडे वस्ती सभामंडप आदी करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे यांचे तुळजाभवानी नवरात्र उत्सवास दरवर्षी सहकार्य असते म्हणून तुळजाभवानी मंदिर समितीचे वतीने सरपंच बापूराव गावडे यांचा वाढदिवस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा पाणीपुरवठा समिती सदस्य विश्वास दादा गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बजरंग खटके, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके, तानाजी गावडे पाटील,गोखळी विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, मिलिंद खटके, जय तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष पै. रामचंद्र गावडे यांनी मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!