बारामती दि 29 ( फलटण टुडे ) :
बारामती येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल बारामती व बारामती क्रीडा शिक्षक संघटना आयोजित तालुकास्तरीय भव्य बुद्धिबळ स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल,बारामती येथे पार पडल्या यामध्ये 26 शिक्षकांनी सहभाग घेतला होता .
या स्पर्धेमधे प्रथम क्रमांक – सचिन सुभाषराव नाळे, जनहित विद्यालय बारामती. द्वितीय क्रमांक प्रमोद रणवरे शारदानगर तृतीय क्रमांक महेश चावले साहेब (बारामती तालुका क्रीडाधिकारी) चतुर्थ क्रमांक निलेश दरेकर स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर पाचवा क्रमांक आबासाहेब कोकरे वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी सहावा क्रमांक प्रा. दत्तराज जगताप मु.सा.काकडे कॉलेज सोमेश्वर नगर सातवा क्रमांक संजय होळकर सर सोमेश्वर विद्यालय मुढाळे आठवा क्रमांक अभिजित चव्हाण यांना मिळाला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी मा.कसगावडे साहेब,क्रीडाधिकारी देवकाते साहेब,बारामतीचे तालुका क्रीडाधिकारी चावले साहेब ,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य मा .मुरूमकर सर,बारामती क्रीडाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे सर ,देवकर सर ,मेटकरी सर इ मान्यवर उपस्थित होते
या स्पर्धी यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य महेश चावले साहेब तालुका क्रीडा अधिकारी बारामती यांचे लाभले तर मार्गदर्शन राजेंद्र खोमणे सर,अध्यक्ष तालुका क्रीडा शिक्षक संघटना बारामती यांचे लाभले व यामूळे स्पर्धो यशस्वी पार पडल्या