9 ऑक्टोबरला कटफळ येथील श्री.जानाई देवीची यात्रा

बारामती तालुक्यातील एमआयडीसी मधील कटफळ येथील जानाई देवीची यात्रा ९ व १० ऑक्टोबर रोजी होणार आहे

कटफळ चे ग्रामदैवत श्री जानाई देवी


बारामती ( फलटण टुडे ) :
कटफळ येथील श्री क्षेत्र जानाई देवीच्या यात्रेला ६ तारखेपासून घटस्थापना करून सुरुवात झाली आहे. त्यानंतर रविवारी ९ तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दिवशी गावातील सर्व समाजाच्या, देवीच्या आरत्यांचा कार्यक्रमास सकाळ पासून सुरुवात होणार आहे. व संध्याकाळी पंचक्रोशीतील शेटफळ, शिर्सुफळ, पारवडी, गोजुबावी, शिरवली, पेडगाव, तांदूळवाडी, उंडवडी इत्यादी गावांच्या छबीन्यांचा कार्यक्रम होणार आहे. व त्याच रात्री १२ वाजता शेटफळचे मानाचे काटकर उभा राहणार आहेत. व १० तारखेला पहाटे पेडगावच्या काटकरांचा भाकनुकीचा कार्यक्रम होणार आहे. व सोमवारी १० तारखेला सकाळी ९ वाजता व सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध साहेबराव नांदवळकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. व मंगळवार ११ तारखेला सायंकाळी ७ वाजता ऑर्केस्टाचा कार्यक्रम होणार आहे. तरी राज्यातील सर्व जानाई देवी भाविकांनी दर्शनासाठी व विविध कार्यक्रमासाठी उपस्तित राहण्याचे आवाहन ग्रामपंच्यात सरपंच पुनम किरण कांबळे व देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!