सावळेपाटील प्रस्तुत होम मिनिस्टरला प्रचंड प्रतिसाद
भवानीनगर (फलटण टुडे ) : 100 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान लाभलेले कै. बाळासाहेब बाजीराव निंबाळकर व सणसर चे माजी सरपंच कै. कृष्णराव बाळासाहेब निंबाळकर यांचे स्मृती प्रित्यर्थ सणसर येथे श्री तुळजाभवानी नवरात्र उत्सवानिमित्त नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये मंजिरी शिंदे यांनी प्रथम बक्षीस सोन्याची नथ व पैठणी पटकावले.
याप्रसंगी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना माजी संचालिका श्रीमती शिलाकाकी निंबाळकर, सणसरचे सरपंच श्री. पार्थ निंबाळकर,कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे संचालक श्री.संग्राम निंबाळकर, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री.संजय कृष्णराव निंबाळकर व श्री.तानाजी उर्फ बाबा कृष्णराव निंबाळकर,प्रशांत स्टील अँड फर्निचरचे श्री.प्रशांत नेवशे, आझाद तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासन गुणवंत पुरस्कार प्राप्त श्री प्रकाश शिंदे, श्री भाग्यलक्ष्मी सराफचे प्रोप्रा श्री. जगदीश कांबळे, श्री.सुमेध निंबाळकर सर, श्री. राजेंद्र शिंदे सर,श्री.संजय शिंदे, ह. भ. प. श्री. सुरेशमहाराज ढगे, श्री आबासो निंबाळकर व सुमारे 300 महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गेली 42 वर्षे पासून या श्री भवानीमाता मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे पैकी गेली 24 वर्षापासून नवरात्र उत्सवामध्ये कीर्तने, भारुड, प्रवचने, महिलांसाठी दांडिया, श्री देवी स्तोत्रपठण इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जात आहेत. नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या नवरात्रीमध्ये सामान्य ज्ञान, खेळ व प्रश्नोत्तराचा कार्यक्रम यावर आधारित हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन , करण्यात आले होते. दुसरा नंबर चांदीचा करंडा व नॉनस्टिक प्रेशर कुकर सौ वैशाली अभिजीत निंबाळकर, तिसरा नंबर चांदीची लक्ष्मी मूर्ती व डिनर सेट सौ शितल संदीप गाडे, चवथा नंबर सेमी पैठणी साडी सौ तनुजा सचिन भोईटे, पाचवा नंबर हॉटपॉट सौ. सविता रमेश सोनवणे तर सहावा नंबर चकली यंत्र कु. सारा मुस्तफा सय्यद यांनी पटकावला. या कार्यक्रमाला श्री भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा जगदीश कांबळे सणसर, दिया सिल्क, मारवाड पेठ, बारामतीचे प्रोप्रा अंकित जैन, श्री महालक्ष्मी ज्वेलर्स सणसरचे प्रोप्रा श्री रमेश कांबळे , श्रीकृष्ण ज्वेलर्स सणसरचे श्री गणेश कांबळे, प्रशांत स्टील अँड फर्निचर जाचकस्तीचे प्रोप्रा श्री प्रशांत नेवशे, विना हॅण्डलूम, अवधूतनगर, बारामतीच्या प्रोप्रा प्रियंका निंबाळकर, विपुल मोबाईल शॉपीचे प्रोप्रा श्री विपुल डुडू यांचे विशेष सहकार्य लाभले. विजेत्यांना श्री प्रशांत नेवसे, सौ. रूपाली जगदीश कांबळे,सौ.ज्योती कविराज निंबाळकर, सौ. जयश्री संजय निंबाळकर, सौ. शुभांगी प्रताप निंबाळकर यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान श्री पार्थ निंबाळकर यांची सणसरच्या नूतन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल, श्री प्रकाश शिंदे यांची ई पी एस 95 सेवानिवृत्त कर्मचारी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच ह भ प, श्री सुरेश महाराज ढगे यांचा जाहीरात सहकार्याबद्दल, श्री अनिल सावळे पाटील यांचा उत्कृष्ट सुत्रसंचालनाबद्दल श्री सलीम सय्यद यांचा कै किशोरकुमार यांच्या गीतावर आधारित गाण्यांच्या कार्यक्रम सादरीकरणाबद्दल तसेच कार्यक्रमाला बक्षिसे व इतर सहकार्याबद्दल प्रशांत स्टील अँड फर्निचर चे श्री प्रशांत नेवशे, श्री भाग्यलक्ष्मी ज्वेलर्सच्या सौ रुपाली कांबळे, श्रीकृष्ण ज्वेलर्सच्या सौ कांबळे, श्रीराम एंटरप्राइजेस च्या सौ तनुजा भोईटे, माधुरी मंडप अँड डेकोरेटर्सच्या सौ.विद्या गायकवाड यांचा सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थितांचे श्री प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.