महाराष्ट्र राज्य अँमँच्युअर खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटी , फलटण चे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण दि. ५ (फलटण टुडे ) :
महाराष्ट्र राज्य अँमँच्युअर खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटी , फलटण चे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटी , फलटण अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धाचे
आयोजन शनिवार ०८ आँक्टोबर व रविवार ०९ आँक्टोंबर २०२२ रोजी होत असल्याची माहिती फलटण.एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा विभाग सचिव सचिन धुमाळ यांनी दिली.
फलटण एज्युकेशन सोसायटी , फलटण मधील विविध शाखामधे शिकत असणारे विद्यार्थ्यांच्या खेळातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होण्यासाठी सदर क्रीडा स्पर्धाचे आयोजन दि.०८ व ०९ आँक्टोंबर २०२२ रोजी मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उदघाटन शनिवार दि.०८ आँक्टोंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून या समारंभास प्रमुख पाहुणे तालुका क्रीडा अधिकारी , फलटण मा. महेश खुटाळे , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष, क्रीडा समिती ,फ.ए.सोसायटी,फलटण सदस्य,ग.कौ. ,फ.ए.सोसायटी,फलटण मा. शिवाजीराव घोरपडे हे असणार आहेत व प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पञकार , दै. ऐक्य मा. अरविंदभाई मेहता, प्र.प्राचार्य , मुधोजी महाविद्यालय,फलटण मा. डाँ. पी.एच.कदम , प्राचार्य , श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय,व कृषि महाविद्यालय, फलटण मा. डाँ.सागर निंबाळकर , प्राचार्य , अभियांत्रिकी महाविद्यालय , फलटण मा. डाँ. अनिरुद्ध महात्मे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
या क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो , व्हाँलीबाँल , व अँथलेटिक्स मधील क्रीडा प्रकारांचा समावेश असून या तिन्ही खेळात मुले व मुली यांचे संघ असणार आहेत . या स्पर्धेसाठी १४ ,१७ वर्ष मुले मुली व खुलागट( २३ वर्षा आतील ) मुले – मुली असे वयोगट करण्यात आले आहेत . सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेते खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहे .तसेच विशेष प्रोत्साहनासाठी सहभागी खेळाडू यांना सहभाग प्रमाणपञ देण्यात येणार आहे . सदर क्रीडा स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटी , फलटण मधील विविध शाखेतील सुमारे २६ शाळा व महाविद्यालयानी सहभाग नोंदविल्यांची माहिती क्रीडा समिती सचिव श्री.सचिन धुमाळ यांनी दिली.