फलटण दि.०५ ( फलटण टुडे ):
फलटण एज्युकेशन सोसायटी व मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटणच्या संयुक्त विद्यमाने फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. जिल्हा परिषद अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो – खो असोशिएशन चे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचा ९ ऑक्टोबर 2022 रोजी साजरा होत असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण येथ शाळा स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये चित्रकला , निबंधलेखन व वक्तृत्व या सर्व स्पर्धो दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धा प्रामुख्याने गटानुसार घेतल्या जातील यामधे चित्रकला स्पर्धा दोन गटात घेतल्या जातील चित्रकलेसाठी प्रथम गट इयत्ता ५ वी ते ७ वी व दुसरा गट इयत्ता ८ वी ते १० वी या गटात घेतल्या जातील
यामध्ये चित्रकला स्पर्धसाठी प्रथम गट इयत्ता ५ वी ते ७ वी चित्रकला स्पर्धा
दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत घेतल्या जातील .
या स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे.
१ )माझी शाळा
२) वृक्षारोपण
3) माझा आवडता खेळ
दुसरा गट इयत्ता ८ वी ते १० वी साठी चित्रकला स्पर्धा दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ ते 3 या वेळेत घेण्यात येतील
यासाठी पुढील विषय देण्यात आले आहेत.
१) कोणताही सण/उत्सव
२) बागकाम करणारी मुले-मुली ३ )कोणताही किल्ला
या चित्रकला स्पर्धेसाठी येताना स्पर्धकांनी रंग, वन फोर साईज ड्रॉइंग पेपर साहित्य घेऊन यावे असे अवाहन करण्यात आले आहे .इयत्ता ५वी ते ७ वी साठी नाव नोंदणी बी. डी. सुर्यवंशी सर यांच्याकडे तर ८ वी ते १० वी गटासाठी नाव नोंदणी सतीष नाळे सर यांच्याकडे करावी .
मुधोजी हायस्कूल व ज्युनि.
कॉलेज फलटण च्या इयत्ता ११वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या साठी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यासाठी खालील विषय देण्यात आले आहेत .
निबंधलेखनाचे व
वक्तृत्व विषय.
१) लॉकडाऊन मुळे मला जगणे समजू लागले.
२) राजकारणातील आदर्श व्यक्तीमत्व- श्रीमंत संजीवराजे.
३)स्वातंत्र्यलढ्यात समाजसुधारकांचे योगदान.
४) माझा शेतकरी राजा.
तरी इयत्ता११ वी व १२ वी च्या ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धामध्ये सहभाग घ्यायचा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपली नावे खालील शिक्षकांकडे नोंदवावी .
१) श्री. पवार सर
२) सौ.गोडसे मॅडम
३) सौ. जगताप मॅडम.
४) श्री. रणवरे सर
इयत्ता ५ वी ते १० वी साठी वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय खालील प्रमाण
इयत्ता ८ वी. ते. इ. १० वी, गट
१ ) संस्कार हवेत भविष्यासाठी
२) माझ्या स्वप्नातील गाव
3) राजकारणातील दुरदृष्टी असणारा नेता. – श्रीमंत संजीवराजे
४) जीवन सुंदर आहे.
५) हरवलेले बालपण
इयत्ता ५ वी. ते. ७ वी. गट
१) माझी शाळा माझे गुरुजन
२) भारतीय सण आणि निसर्ग
३ ) माझे प्रिय आई – बाबा
४) संताच्या विचारांची गरज
५) मला आवडलेलं पुस्तक
वरील स्पर्धेसाठी नावे डी .टी . जगताप सर यांच्या कडे नोंदवावीत
तर इयत्ता ८ वी ते १० वी निबंध
निबंध स्पर्धेसाठी विषय खालील प्रमाणे
१) फलटण चा ऐतिहासिक वारसा
२) समाजाभिमुख श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
३) श्रीमंत संजीवराजे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व
४) फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक
वरील स्पर्धेसाठी नाव नोंदणी अमोल कर्वे सर यांच्याकडे नोंदवावीत .
विविध स्पर्धेसाठी वरीलप्रमाणे विषय देण्यात आले असून प्रशालेतून
वरील स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी केले आहे .