ज्ञानसागर गुरुकुल सावळमध्ये भोंडला उत्साहात साजरा

सावळ (बारामती) दि.1 आक्टोंबर 2022
भोंडला महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून उत्सवाची सुरुवात होते. हस्त नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला की दुसऱ्या दिवशी हातगा म्हणजेच भोंडला. यावेळी ज्ञानसागर गुरुकुल सावळच्या प्रांगणामध्ये मध्यभागी पाटावरती हत्तीची मूर्ती प्रतिमात्मक चित्र ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी ,शिक्षिका, महिला कर्मचारी व महिला पालकांनी आदिशक्तीची विधिवत पूजा करून फेर धरत पारंपारिक गीते व दांडिया नृत्य सादर केले.यावेळी कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या उपाध्यक्षा रेश्मा गावडे व संचालिका पल्लवी सांगळे यांनी गजपूजन केले.यावेळी गायत्री कुलकर्णी यांनी देवीची आरती व मंत्र पूजन केले .
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भोंडल्या विषयाची माहिती व संदेश व पारंपारिक गीता बरोबरच वृक्षसंवर्धनाचा व महिला आरोग्याचा आधुनिक संदेश देत महिला  व विद्यार्थ्यांनी , दांडिया खेळाचा मनमुराद आनंद लुटला .निलिमा देवकाते,स्वप्नाली जगताप ,राधा नाळे यांनी  भोंडल्या विषयी माहिती सांगितली.
आजही आधुनिक कामात वेगवान जीवन जगताना स्पर्धा ताणतणाव यातून मुक्त होण्यासाठीआणि दोन घटका आनंद प्राप्तीसाठी पारंपारिक पद्धतीचा भोंडला साजरा केला.
या कार्यक्रमप्रसंगी  ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष श्री. सागर आटोळे  ,उपाध्यक्षा रेश्मा गावडे,सचिव मानसिंग आटोळे, संचालिका पल्लवी सांगळे,दिपक बीबे,सीईओ. संपत जायपत्रे , विभाग प्रमुख गोरख वणवे ,मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय शिंदे , निलिमा देवकाते ,स्वप्नाली दिवेकर,राधा नाळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व  महिला पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!