फलटण:- फलटण शहर व परिसरातील फ्लॅट, बंगलो प्लॅाट, दुकाने, ॲाफिसची उपलब्धता चांगली असुन, या प्रॅापर्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याठी बिल्डर्स असोसिएशन ॲाफ इंडिया, फलटण सेंटरने *वास्तु-२०२२* हे प्रदर्शन दि. २२ व २३ ॲाक्टोंबर २०२२ रोजी दीपावलीच्या शुभ-मुहूर्तावर मुधोजी हायस्कूल फलटणच्या प्रांगणात आयोजित केले आहे.अशी माहिती अससोसिएशनचे चेअरमन श्री.राजीव नाईक निंबाळकर यांनी दिली.
या प्रदर्शनाचा लाभ बांधकाम व्यवसायीकांबरोबरच ग्राहकांना सुद्धा होणार असुन, एकाच वेळी अनेक घरांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध असतील. घरांबरोबरच वित्तीय संस्था, बांधकाम साहित्य, फर्निचर, बांधकाम मशिनरीचे विक्रेते सुद्धा यामध्ये सहभागी होणार असलेचे त्यांनी सांगितले.
यामध्ये बांधकाम व्यवसायाशी संदर्भीतांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन पदाधिकारी श्री.प्रमोद निंबाळकर श्री.रणधीर भोईटे श्री.सुनील सस्ते श्री.दिलीप शिंदे,श्री.प्रमोद उर्फ बापू जगताप श्री.महेश साळुंखे श्री.सचिन निंबाळकर आदींनी केले आहे.