राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर राष्ट्रीय कार्यकारणीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी या निवडी जाहिर केल्या आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातून श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे श्रीमंत रामराजे यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.