फलटण एज्युकेशन सोसायटीच्या तपासणी अधिकारी मा. दिलीप राजगुडा यांचे स्वागत करताना मधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे,मुधोजी ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य मा. एम के फडतरे, मुधोजी हायस्कूल सकाळ विभागाचे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे इत्यादी मान्यवर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे सर
फलटण दि १५ ( फलटण टुडे ) :
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शालेय कामकाजात अनेक वेळा अडी अडचणी ना सामोरे जावे लागते . त्यावेळस योग्य मार्गदर्शनाची व मार्गदर्शकाची अवश्यकता असते त्यामुळे येणाऱ्या समस्येवर योग्य मार्ग सापडतो व वेळेची बचतही होत असते .
त्यामूळे फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण येथे शालेय व कार्यालयीन कामकाज मार्गदर्शना चे तीन टप्प्यांत आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहिले सत्र सकाळ विभागातील इयत्ता ५ वी ते ७ वी च्या व इयत्ता ११ वी व १२वी च्या शिक्षकांसाठी दुपारी १२ ते १ या वेळेत करण्यात आले होते . तर दुसरे सत्र दुपारी ४ ते ५ या वेळेत शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी केले गेले होते. तर इयत्ता ८ वी ते १० वी च्या शिक्षकांसाठी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ठेवण्यात आले होते .
सदर कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे तपासणी अधिकारी मा. दिलीप राजगुडा यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे ,
मुधोजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य मा. एम के फडतरे , मुधोजी हायस्कूल सकाळ विभागाचे पर्यवेक्षक मा. शिवाजीराव काळे ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. माणिकराव सोनवलकर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य मा.बाबासाहेब गंगवणे .यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की गुणवत्ता विकास वाढवणे शैक्षणिक कार्यालयिन अडीअडचणी साठी व समन्वयासाठी आपणास त्या समस्या दूर करणं व चाकुरीबद्ध व्यवस्थापन व कामकाज झाले पाहिजे यासाठी आपणास मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे या ठिकाणी आपण हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे . याचा निश्चितच लाभ शिक्षकांना होईल व यातून गुणवत्ता पूर्ण शिक्षण व शालेय कामकाज व्यवस्थितपणे करता येईल . याचा लाभ शाळेच्या गुणवत्तेसाठी , उन्नतीसाठी व विकासासाठी निश्चितच होईल असे यावेळी त्यांनी सांगितले .
यावेळी मार्गदर्शन करतानाफलटण एज्युकेशन सोसायटीचे तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा सर यांनी शालेय कामकाज व कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी वरती योग्य प्रकारे मार्गदर्शन केले व शिक्षक यांचे समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यावर योग्य मार्गदर्शन केले . यामध्ये त्यांनी सांगितले की आपणास व्हाट्सअप व युट्युब याच्यावरती अनेक पत्र , माहिती व अनेक संभ्रम करणारे मेसेजेस येत असता त्यामुळे शिक्षकांची द्विधा मनस्थिती निर्माण होते .कोणते काम करावे व कोणते काम करू नये यामध्ये त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो .हे दूर करण्यासाठी आज इथं आपण जमलो आहे .
यावेळे म्हणाले की आपल्या शाळेचा निकाल १०० % लागतो पण त्यातील किती जण डिस्टिंक्शनमध्ये पास झाले किती जण फर्स्ट क्लास पास झाले किती जण सेकंड क्लास झाले व किती जण नापास झाले याचे जर मूल्यमापन करायचे ठरवले तर यामध्ये ५0% पेक्षा जास्त मुले पास होणे सोपी गोष्ट नाही . निकालाला गुणवत्ता असली पाहिजे यासाठी शिक्षक जागरूक असला पाहिजे व आपल्या निर्णयावर ती ठाम असला पाहिजे. त्याला काय करायचे आणि काय नाही करायचे याचे ज्ञान अवगत असले पाहिजे यापूर्वीचे शैक्षणिक वातावरण व आत्ताचे शैक्षणिक वातावरण यामध्ये खूप तफावत आहे आज काल काम करत असताना आपल्याला एस एस कोडची माहिती असणे फार गरजेचे आहे त्यामधील माहिती चा आपल्याला शालेय कामकाजामध्ये कसा उपयोग करता येईल याचे ज्ञान अवगत असले पाहिजे. एस एस कोड प्रमाणे जर आपण कामकाज केले तर आपल्याला अडीअडचिंचा सामना करावा लागणार नाही.असे यावेळी त्यांनी सांगितले .
यामध्ये आपण खालील गोष्टींचे काटेकोर पणे पालन केले पाहिजे शिक्षक म्हणून वेळेवर हजर राहाणे व टाईम मस्टर वरती जाताना व येतानाची सही करणे व मेन मस्टर वरती न विसरता सही करणे आपली जबाबदारी आहे . तसेच महिना अखेर पूर्ण होताना आपल्या राजा व आपल्या मस्टरच्या पुढील शेरा रकाण्यात लिहिलेल्या रजा याची खातरजमा व ताळमेळ आहे का त्यातील बारकावे तपासून पहाणे इत्यादी गोष्टी जागरूकतेने करायला हव्यात. तसेच किरकोळ रजा , अर्जित रजा , वैद्यकीय रजा व कर्तव्य रजा याचा ताळमे आखणे व आपण रजा घेत असताना त्याची पोच घेणे हे आवश्यक आहे . यासाठी प्रत्येक शिक्षकाने आपल्याकडे एक डायरी असणे आवश्यक आहे व त्या डायरीमध्ये यांच्या नोंदी ठेवणे महत्त्वाचे आहे .
तसेच टाचण वही असावी की नसावी हा अनेक शिक्षकांना पडलेला प्रश्न आहे पण यामध्ये टाचण वही हे पाठ नियोजनाचे साठी महत्त्वाची गोष्ट आहे . आपण विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहोत याचे नियोजन आधीच करणे व त्या नियोजना प्रमाणे विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानार्जुन करणे ही आपली जबाबदारी आहे . त्यासाठी शिक्षकाची पूर्वतयारी असणे महत्त्वाचे आहे . तर तो शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत योग्य ज्ञान पोहोचू शकतो तसेच आपली टाचण वही ही आदर्श टाचण वही असली पाहिजे. त्यावरती रोजच्या रोज सह्या घेणे आवश्यक आहे व रोजच्या रोज टाचण लिहिणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. टाचन वही असल्याशिवाय वर्गात शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे . तसेच वर्गामध्ये शिकवताना शिक्षकाची देहबोली तसेच शिक्षकांच्या चेहऱ्यावरील सकारात्मकता तसेच विषयाचे पूर्वज्ञान आहे का ? फळा कसा पुसला जातो हे ही पहाणे फार महत्त्वाचे आहे .
तसेच स्वाध्याय व गृहपाठ याबद्दलही त्यांनी योग्य मार्गदर्शन केले स्वाध्याय किती घ्यावेत व गृहपाठ किती घ्यावे यावरती त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले . तसेच आपल्या सेवापुस्तकातील पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत जे काही लिहिले गेले आहे . त्याची योग्य तपासणी करून घेणे व त्यातील त्रुटी दुरुस्त करून घेणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी आहे . असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच गोपनीय अहवाल लिहीत असताना अ ब क यामधील कोणकोणत्या बाबी कशाप्रकारे त्या ठिकाणी समाविष्ट केल्या पाहिजेत लिहिल्या पाहिजेत याचे योग्य मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले तसेच प्रकल्प , प्रोजेक्ट याविषयी योग्य मार्गदर्शन केले .
त्यानंतर आपणाकडे असलेल्या विभागाचे लेखी कामकाज रेकॉर्ड आपल्याकडे असावे ते रेकॉर्ड आपल्याकडे कमीत कमी तीन वर्ष तरी ते सांभाळून ठेवता आले पाहिजे . असे आपण नियोजन करावे असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच घटक नियोजन हे दरवर्षी हाताने लिहिले गेले पाहिजे त्यामुळे लिहिण्याचा सराव होईल . आताच्या युगामध्ये लिहिण्याचा सराव होताना दिसत नाही त्यामुळे शिक्षकाने हाताने घटक नियोजन लिहावे असे यावेळी त्यांनी सांगितले व तसेच अभ्यासक्रमाचे नियोजन हे करावे अभ्यासक्रमासाठी 200 दिवस असतात . त्यामध्ये 200 दिवसाचा योग्य अभ्यासक्रमासाठी आराखडा आखला गेला पाहिजे . प्रत्येक घटकाला योग्य न्याय त्या दिवसांमध्ये देता आला पाहिजे असे यावेळी त्यांनी सांगितले .त्यांनी आपल्याला आपल्या प्रशालेमध्ये मार्गदर्शनासाठी बोलावल्याबद्दल सर्वांचे आभार मानले .
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुधोजी ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य मा. एम के फडतरे यांनी केले व आभार प्रदर्शन मुधोजी हायस्कूलच्या सकाळ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी मा नितीन जगताप यांनी मानले .