जळोची :
कटफळ येथील झैनबिया स्कूल मध्ये 14 सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. यावेळी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हिंदी कविता, वाचन, वाक्य अनुवाद, पोस्टर मेकिंग, शुभेच्छा कार्ड बनवणे, निबंध लेखन, गोष्ट सांगणे ,सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, निबंध,भाषण यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्पर्धेमध्ये स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व या दिवशी विद्यार्थ्यांनी “हिंदी भाषेचे महत्व” या विषयावर भाषणे दिली तसेच लघु नाटिकेचे सादरीकरण करण करण्यात आले, यावेळी शाळेच्या प्राचार्या इन्सिया नासिकवाला यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व विविध बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. अशा प्रकारे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला.