फलटण दि. १२ : सुसंस्कृत अध्यापन कार्याची दखल घेऊन जुलै 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत फलटण येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय धार्मिक महोत्सवामध्ये फलटण तालुका वारकरी संघटनेच्या वतीने दिला जाणारा विद्याभूषण पुरस्कार आदरणीय गुरुवर्य ह .भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या शुभहस्ते फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व जुनियर कॉलेज,फलटण येथे इंग्लिश विषयाचे अध्यापनकार्य करणारे सुजित सुरेश जमदाडे यांना विद्याभूषण या सन्मानाने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येस गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे रविंद्र बेडकीहाळ व निकम एन. बी. यांच्या हस्ते विद्याभूषण गुरुजन सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मुधोजी हायस्कूल ,फलटण चे माजी प्राचार्य रविंद्र येवले , प्रसिद्ध कथाकथनकार व प्रेमिलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक रवींद्र कोकरे तसेच फलटण तालुक्यातील इतर शाळांमधून आलेले मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षक वृंद व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या सन्माना बद्दल जमदाडे सर यांचे अभिनंदन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती मा. नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी श्री अरविंद निकम सर तसेच मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री बाबासाहेब गंगवणे सर , उपप्राचार्य श्री फडतरे एम. के. सर , सकाळ विभाग पर्यवेक्षक श्री शिवाजीराव काळे सर , सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी यांच्यासह जाधववाडी (फलटण) ग्रामस्थ ,मित्रपरिवार व नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.