बारामती :
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी 7 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा NEET UG 2022 चा निकाल जाहीर केला. लडकत सायन्स अकॅडेमीच्या गंगासागर सावंत या विज्ञार्थिनीने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पदवी 2022 परीक्षेच्या निकालात अव्वल स्थान पटकावले आहे तिला एकूण 720 पैकी 615 मार्क मिळाले आहेत ,तसेच द्वितीय क्रमांक साहिल जाधव याने 720 पैकी 555 मार्क्स मिळवले व तृतीय क्रमांक रोहित कल्याणकर याने 504 मार्क्स मिळवले आहेत,सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन अकॅडेमीचे संचालक मा. नामदेव लडकत सर व गणेश लडकत सर यांनी केले तसेच यशस्वी विध्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले, या प्रसंगी बोलताना गंगासागर सावंत या विद्यार्थिनीने लडकत सायन्स अकॅडेमितील अद्यावत क्लास रूम, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच अवघड विषय सोपा करून शिकवण्याच्या शिक्षण पद्धतीचा तिला खूपच फायदा झाला असे सांगून संचालक व सर्व विषय शिक्षकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी अकॅडेमीचे संचालक मा. नामदेव लडकत सर व मा. गणेश लडकत सर,तसेच आखाडे सर,माने सर,प्राजक्ता मॅडम,काळे सर,नितीन सर, अना चौधरी मॅडम,रुपाली मॅडम इ. उपस्थित होते.