तब्बल १७ वर्षानंतर भरला विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.

बारामती ( फलटण टुडे ) :
कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी येथे रविवार दि.२८/०८/२०२२ रोजी तब्बल सतरा वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा भरवला . 
 कार्यक्रमास शाळेचे माजी  मुख्याध्यापक मा.  दस्तगीर सर, संस्थेचे संचालक मा.  दत्तात्रय वाबळे, संस्थेचे प्राचार्य  कदम मॅडम, माजी शिक्षक के. के. वाबळे, के. स. लोणकर, यू. एम. शिंदे तसेच इतर शिक्षक  व २००५-०६ बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. दस्तगीर सर यांनी बोलताना आपले विद्यार्थी उचित ध्येय गाठून यशाच्या शिखरावर पोचले असल्याचे समाधान व्यक्त केले. माजी विद्यार्थी नामदेव लडकत, सुहास लडकत, प्रकाश करे, शशिकांत मेहेत्रे, महेश लोणकर, विशाल साळुंखे,सोनाली चांदगुडे, शुभांगी लडकत, गौरी शिवरकर यांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांनी दिलेले ज्ञान व संस्कार याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शिंदे व सुनिता रसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद वाबळे यांनी केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!