फलटण (फलटण टुडे ) :
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य आयोजित,राज्यस्तरीय वाचनयात्री पुरस्कार 2022 वितरण समारंभ रविवार दि.21 ऑगस्ट 2022 रोजी बारामती या ठिकाणी संपन्न होणार असून श्री.मनोज अग्रवाल (औरंगाबाद) व श्री.राजू गरमडे (नागपूर) यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. 100 पुस्तकांचे वाचन करून त्या पुस्तकाचे समीक्षण केल्याबद्दल व वाचन संस्कृती वाढवल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री.गणेश तांबे यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण श्री .माधव जोशी सर अध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ बारामती यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री.विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी, जिल्हा परभणी,श्री.हनुमंत चांदगुडे
पाठ्यपुस्तकातील कवी व गीतकार,श्री. रविंद्र टिळेकर सर
अधिव्याख्याता शिक्षणशास्र महाविद्यालय बारामती इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रम हा जेष्ठ नागरिक संघ सभागृह कुस्तीगीर संघाजवळ ,
टी.सी.कॉलेज रोड ,बारामती जि.पुणे येथे दुपारी 12.30 वाजता सुरू होणार असून सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे अवाहन आयोजक व आत्मप्रेरणा पुस्तकाचे लेखक श्री. लक्ष्मण जगताप सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य कार्यकारी मंडळातील संयोजिका श्रीमती प्रतिभा लोखंडे,सहसंयोजक
श्री.रविंद्र लटिंगे ,कार्याध्यक्ष
श्री.गणेश तांबे, उपाध्यक्ष
श्रीमती.अंजली गोडसे, कोषाध्यक्ष श्री.लक्ष्मण जगताप,
प्रसिद्धीप्रमुख,श्री.कचरू चांभारे,
संपर्कप्रमुख श्रीमती. ज्योती कोहळे,श्रीमती पूनम कोसे (गुजर) इ. या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.