ओम सावळेपाटील कझाकिस्तान आयर्नमॅन स्पर्धेत दुसरा

 

ओम सावळेपाटील याचा दुसरा क्रमांक देताना कझाकिस्तान चे  मान्यवर
बारामती ( फलटण टुडे ):
 कझाकिस्तान येथे झालेल्या
 आयर्नमॅन स्पर्धेत बारामती च्या आठ   खेळाडूंनी ” फुल्ल आयर्नमॅन”  व दिग्विजय सावंत  याने  ‘हाल्फ आयर्नमॅन”
किताब जिंकला तर   18 ते 24 वयोगटात ओम सावळेपाटील  याने जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक पटकविला. 
वर्ल्ड ट्रायथोन असोसिएशन ऑफ कजाकिस्तान यांच्या वतीने 
14 ऑगस्ट रोजी कझाकिस्तान ची राजधानी नूर सुलतान येथे आयर्नमॅन स्पर्धा संपन्न झाली यामध्ये 65 देशातील 3100 स्पर्धकांनी भाग घेतला. या मध्ये 180 किमी सायकल चालविणे, 42 किमी पळणे व 3.8 किमी पोहणे हे तिन्ही खेळ लागोपाठ  16 तासाच्या आत पूर्ण करणे गरजेचे असते. या मध्ये बारामती चे,ओम सावळेपाटील,  अवधूत शिंदे, विपुल पटेल,राजेंद्र ठवरे, डॉ वरद देवकाते, युसूफ कायमखाणी, अभिषेक ननवरे व मयूर आटोळे यांनी  ‘फुल आयर्नमॅन’ तर दिग्विजय सावंत याने “हाल्फ आयर्नमॅन’ स्पर्धा पूर्ण केली.वेळेत 
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले. 
  कझाकिस्तान स्पर्धा संचालक अलेक्स सीदोरेनको,कझाकिस्तान युवक व क्रीडा विभागाच्या  सचिव सोरोनो नवरतालंका व आयर्नमॅन
प्रथम क्रमांक विजेता वायेशाल्व सोकोलव आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत उत्कृष्ट गुणप्राप्त  विजेत्या खेळाडूंना ट्रॉपी देऊन सन्मानित करण्यात आले.
जलतरण साठी महादेव तावरे व सुभाष बर्गे, सायकलिंग पंकज रवाळु, आहार डॉ योगेश सातव व डॉ नीता धामेजानी व बारामती सायकल क्लब  यांनी खेळाडूंना  मार्गदर्शन  व  सहकार्य केले. 

चौकट : 
सदर स्पर्धे मध्ये अत्याधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक पॉईंट वर  केलेला असतो त्यामुळे शॉर्टकट किंवा  चुकीच्या पद्धतीचा  चा वापर केल्यास ट्रॅकिंग प्रणाली मध्ये  संयोजक यांना दिसत असल्याने जे  खेळाडू  स्पर्धा वेळेत तर पूर्ण करतात  परंतु नियम  अटी व शर्ती चे पालन करतात त्यांना  उत्कृष्ट गुणांक देण्यात येते   फक्त  याच  खेळाडूंना   ट्रॉपी देऊन सन्मानित करण्यात येते याच आधारावर जागतिक स्तरावर ओम सावळेपाटील यांना युवा वयोगटात दुसरा क्रमांक देण्यात आला. 
  

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!