डोर्लेवाडी च्या उपसरपंचपदी संदिप सुभाषराव नाळे बिनविरोध

 संदिप सुभाष नाळे यांची उपसरपंच पदी निवडीबद्दल सत्कार प्रसंगी ग्रामविकास अधिकारी आर. टी. कारंडे , सरपंच पांडुरंग सलवदे इतर मान्यवर

डोर्लेवाडी, ता. ९ ( फलटण टुडे ):
 डोर्लेवाडी ता. बारामती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पदाची रिक्त जागेसाठी झालेल्या निवडी वेळी संदीप सुभाष नाळे यांची बिनविरोध निवड झाली.

उपसरपंच पद  रिक्त असलेल्या पदासाठी सोमवारी 8 ऑगस्ट 2022  रोजी सरपंच पांडुरंग सलवदे यांच्या
अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची
निवडणूक घेण्यात आली. संदीप नाळे
यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामविकास अधिकारी आर. टी. कारंडे यांनी संदिप नाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

या वेळी ग्रामपंचायत सदस्य शहाजी दळवी, पुष्पलता मोरे संगीता मदने, अलका भोपळे, सुनीता खोत,दादासाहेब दळवी, रामभाऊ बनकर, बंजारी निंबाळकर , साधना भोपळे, दत्तात्रय नाळे, सुभाष नाळे , अशोक नाळे , सचिन नाळे , योगेश नाळे व इतर मान्यवर तसेच डोर्लेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडी बद्दल उपसरपंच संदिप नाळे यांचे अनेक मान्यवरांनी हार , बुके शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!