स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवा निमित्त वन विभाग फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जन जागृतीसाठी वृक्षदिंडी संपन्न

फलटण दि 12 ( फलटण टुडे ):  
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण  येथे स्वातंत्र्याच्या  अमृत मोहत्सवा निमित्त वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या  सुवर्ण पंक्तीचा वारसा  घेवून  फलटण वनक्षेत्रपाल वन विभाग फलटण व फलटण एयुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विधमाने फलटण शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. 
यावेळी  मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा ) मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सातारा ,  मा. श्री दिपकराव चव्हाण आमदार (फलटण – कोरेगाव विधान सभा मतदार संघ ),  वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सचिन रघतवान साहेब , यांचे मार्गदर्शना खाली वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले . 
 यावेळी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व  मा.  आमदार  दिपकरावजी चव्हाण  यांच्या शुभहस्ते वृक्षदिंडी चे  पुजन करण्यात आले . वृक्षदिंडी चे पुजन झाल्या नंतर वृक्षदिंडीस सुखात मुधोजी हायस्कूल फलटण येथून स्तंभ चौक , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक मार्गे डी.एड चौक येथून श्रीमंत मालोजीराजे साहेब पुतळा , माळजाई मंदिर , महात्मा जोतीराव फुले चौक , गजानन चौक , नरवीर उमाजी नाईक चौक मार्गे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सांगता झाली .

यावेळी वृक्ष दिंडीच्या उदघाटन प्रसंगी मा. तहसीलदार समिर यादव तसेच सामाजिक  वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी  दिगंबर जाधव साहेब , मा. निकम साहेब , मा. माणिकारव सोनवलकर मा. जि.प. अध्यक्ष सातारा,  मुधोजी हायस्कूल फलटण प्राचार्य बाबासाहेब गंगवणे ,  मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे  प्राचार्य  कोळेकर सर, मुधोजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य  फडतरे सर , मुधोजी हायस्कूल चे उपमुख्याध्यापक आण्णासाहेब ननावरे, मुधोजी हायस्कूल चे पर्यावेक्षक शिवाजीराव काळे , प्रतापसिंह ( दादा ) निंबाळकर , जान्राथ (भाऊ) कापसे, तुषार (भैय्या) नाईक निंबाळकर, ज्ञानेश्वर गायकवाड, मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. सुधिर इंगळे इत्यादी मान्यवर व मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व  मालोजीराजे शेती विद्यालया व ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक वृंद उपस्थित होते तसेच wlprs निसर्ग संरक्षण संस्था, योद्धा अँकॅडमी इत्यादी संस्थानी सहभाग नोंदवून वसुंधरेच्या ईश्वरीय कार्याचा जागर करण्यात आला

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!