फलटण ( फलटण टुडे ) :
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे
उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण आणि ईशा फाऊंडेशन पुरस्कृत ‘माती वाचवा
अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयातील अंतिम वर्षातील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांना माती वाचवा
ही काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले.
माती वाचवा अभियान २३ मार्च २०२२ रोजी ईशा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यात्मीक गुरु जग्गी वासुदेव
(सदगुरु) यांनी लंडन मधुन सुरु केले मातीचा घसरत चाललेल्या गुणवत्तेकडे जगाच लक्ष वेधण्यासाठी आणि
जनसामान्यांमध्ये माती वाचवा या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरुंनी लंडनहुन मोटर सायकलवर
१०० दिवसांचा विश्व प्रवास सुरु केला. सदगुरुंच्या म्हणण्यानुसार मातीतच मनुष्याच जीवन आहे. मातीमध्ये
खनिजाचे प्रमाण कमी होवु नये कारण असे झाल्यास पिक उत्पन्नावर आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्न पदार्थ
उपलब्धतेवर परिणाम होईल. माती वाचवा या अभियानातुन प्रदर्शित केलेले महत्वाचे मुद्दे
मोठया प्रमाणावर
सुपिक जमिनीचे नुकसान होत आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मातीमध्ये ३ ते ६ टक्के ऑरगॅनिक कंटेट
असणे गरजेचे आहे.
माती वाचवा अभियान अंतर्गत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि
महाविद्यालय, फलटण येथिल विद्यार्थ्यांमध्ये सदरील विषयांवर जनजागरुकता निर्माण व्हावी तसेच माती वाचवा
अभियानाचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिकतम विस्तार व्हावा हया उददेशाने महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम
आयोजित करण्यात आला. सदरील कार्यक्रमामध्ये माती वाचवा अभियान अंतर्गत स्वयंसेवकानी सदरील विषयावर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदगुरुंचा माती वाचवा या विषयावर चित्रलिपी आणि मातीची गुणवत्ता -हास होण्याची
विविध कारणे या संदेशा द्वारे विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्यात आले. मातीचा १ सेमी थर तयार होण्यासाठी सुमारे
हजारो वर्ष लागतात व माती प्रदुषणाव्दारे मातीची हास होत असलेली सुपिकता या विषयावर स्वयंसेवक श्री. प्रमोद
सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मातीची धुप आणि त्यामागचे कारणे या विषयावर श्री. सुर्यकांत पवार यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माती मधील ऑरगॅनिक कार्बन व सेंद्रिय शेती सद्यपरीस्थीती या विषयावर स्वयंसेवक
श्री.नितेश रावत यांनी सखोल मार्गदर्शन केले. मातीची सुपिकता नष्ट होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय या
विषयावर स्वयंसेवक श्री. सुमित हवालदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माती व पाणी परीक्षण आणि त्याव्दारे
मातीची सुपिकता टिकवुन ठेवने या विषयावर डॉ. पी. एस. खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माती वाचवा
अभियान हे विद्यार्थ्यांमध्ये जनजागरुकता निर्माण करेन तसेच मातीचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक
माध्यमे व विस्तार कार्याव्दारे जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात यावे असे आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्रीमंत
शिवाजीराजे हॉर्टीकल्चर कॉलेज, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निबांळकर यांनी
विद्यार्थ्यांना संबोधित केले.
सदरील कार्यक्रमासाठी माती वाचवा अभियानातील सर्व स्वयंसेवक, डॉ. मधुकर भोईट, श्री.
हरिभाऊ घनवट,महाविद्यालयातील डॉ.जी.बी. अडसूळ, श्री. रणजित निंबाळकर उपस्थित होते.