फलटण (फलटण टुडे ) :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि.९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रम
देशभरात आयोजित केले जाणार आहेत. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृति तेवत राहाव्यात व
देशभक्तीची भावना कायम स्वरुपी मनात राहावी या उददेशाने फलटण तालुका प्रशासनाने आज दिनांक
०९/०८/२०२२ रोजी शालेय, महाविदयालयीन मुले तसेच विविध शासकीय कार्यालये यांच्या माध्यमातून प्रभात
फेरीचे आयोजन केले.फलटण नगरपरिषद शिक्षण मंडळ शाळा, निर्मलादेवी प्राथमिक विदयामंदिर, सहकार
महर्षी हनुमंतराव पवार हायस्कूल, फलटण एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विदयामंदिर,मुधोजी महाविदयालय,
सद्गुरु हरीबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या आनंदवन प्राथमिक विदयामंदिर,हाजी अब्दुल रजाक उर्दू हायस्कूल
अँड ज्युनिअर कॉलेज फलटण इत्यादी शाळा-महाविदयालये यांनी भाग घेतला प्रभात फेरी तहसिल कार्यालय
परिसरातून सुरु होऊन महात्मा फुले चौक,गजानन चौक,उमाजी नाईक चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर
चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाना पाटील चौक या मार्गाने निघून तहसिल कार्यालयात पोहोचली फेरी
दरम्यान शालेय मुलांनी पथनाटय सादर केले शालेय विदयार्थ्यानी विविधतेतून एकता पोषाखा च्या माध्यमातून
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.तहसिल कार्यालयात फेरीची सांगता झाली, यादरम्यान माननीय उपविभागीय
अधिकारी फलटण,
ग, माननीय तहसिलदार फलटण, मा.गटविकास अधिकारी फलटण, मा.मुख्याधिकारी नगर
परिषद फलटण उपस्थित होते. तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हेही उपस्थित
होते.मा.उपविभागीय अधिकारी यांनी मुलांना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्त शुभेच्छा दिल्या
तसेच जनमनात देशभक्तीची भावना निर्माण व्हावी याकरीता प्रभात फेरी आयोजन केले असल्याबाबत
सांगितले यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.