गोखळी ( फलटण टुडे) :
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी पाटी येथे एका रात्रीत चोरट्यांनी चार दुकाने फोडून लाखोंचा माल लांपास केला.गोखळी ते गोखळी पाटी रोडवर परीसरात नव्याने लघुउद्योजकानी उद्योग व्यवसाय थाटले आहेत.रविवारी रात्री या परिसरातील चप्पल दुकान, इलेक्ट्रॉनिक दुकान, दोन कृषी मालांच्या दुकानातील रोख रक्कम, विक्रीसाठी आणलेल्या लाखो रुपयांचा माल चोरून नेला . यापूर्वी सुध्दा या लघुउद्योग वसाहती मध्ये असायचं प्रकारें चोरीचे प्रकार घडले होते सीसीटीव्ही फुटेज देऊन सुद्धा चोरीचा तपास न झाल्याने पोलिस यंत्रणेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित चोरी बद्दल गुन्हे नोंद होऊन सुद्धा आज पर्यंत आरोपी सापडले नसतानाच पुन्हा एकदा चोरीचे प्रकार घडल्याने लघुउद्योजकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी बद्दल सविस्तर माहिती तेजस गावडे यांचे वैष्णवी कृषी सेवा केंद्र फोडून जवळपास अंदाजे ३५हजार, गणेश गावडे यांचे गौरी शू मार्ट फोडून नव्याने विक्रीसाठी आणलेल्या माल रुपये ८४हजार, योगेश गावडे यांचे विघ्नहर्ता इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून अंदाजे ३लाख रुपयांचा इलेक्ट्रॉनिक माल व रोख रक्कम, रणजित खोमणे यांचें शिव ऍग्रो एजन्सी दुकान फोडून अंदाजे ३०हजाराच्या आसपास माल व रोख रक्कम वरील दुकानात असलेला माल व रोख रक्कम चोरीला गेले असल्याचे संबंधित दुकान चालक व मालकांनी सांगितले. तत्कालिन जिल्हा पोलिस प्रमुख मिरा बोरवणकर यांनी तालुक्याच्या प्रमुख सिमावर रात्रीचा पोलिस बंदोबस्त दिला होता त्यावेळी अवैध धंदे आणि चोऱ्यांच्या प्रकारात मध्ये आळा बसला होता.तसाप्रकारे जिल्हा पोलिस प्रमुखांनी लक्ष घालून वारंवार घडणाऱ्या घटना चोऱ्या आणि अवैध धंदे यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सबधित व्यवसायिकांनी फलटण पोलीस स्टेशनची संपर्क साधला असता जागेवर येऊन पंचनामा केल्यानंतर गुन्हा नोंद करू, कर्मचारी आल्यावर पंचनामा करण्यास पाठवले जाईल असे सांगितले अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. फलटण पूर्व भागात चोऱ्या घरफोड्याचे प्रकार वाढले असून या घटनेला आळा न घातल्यास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे असे व्यवसायिकांनी सांगितले