सातारा दि. 8 ( फलटण टुडे ) : शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शिष्यवृत्ती- शिक्षण फी परीक्षा फी योजनेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण अर्ज व नवीन अर्ज नोंदणी दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील काही महाविद्यालयात उशीरा प्रवेश होणे, उशीरा निकाल लागणे इ. कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. विद्याथी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये म्हणून अद्याप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाासनाने मुदत वाढ दिलेली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 13 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
तरी सातारा जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2021-22 शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन महाविद्यालयाकडे सादर करावेत तसेच महाविद्यालयांनी सदरचे अर्ज समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करुन सादर करावेत असे सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांनी कळविले आहे.