फलटण ( फलटण टुडे वृत्तसेवा ):
मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आली असून फलटण ( अ.जा ) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी मतदार कार्ड आधारशी लिंक करावे, असे आवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.
फलटण ( अ.जा ) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादयातील तपशीलाशी आधारची माहिती जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करून कायदा / नियमांमधील सुधारणांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. १ ऑगस्ट . २०२२ पासून लागू करणेत आली आहे. त्यास अनुलक्षून कालबध्द पध्दतीने मतदारांकडून आधार क्रमांक प्राप्त करून घेण्यासाठीचा कार्यक्रम सुरू करण्याचे निश्चित केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदारांना ऑनलाईन पध्दतीने मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक माहितो जोडण्यासाठी अर्ज क्र. ६ ब NVSP या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App या माध्यमावर उपलब्ध करून दिलेला आहे . तसेच आपले यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांचेकडे अर्ज क्र. ६ ब च्या छापिल प्रती उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचेव्दारे मतदारांना आधार माहिती मतदान ओळखपत्राशी जोडता येईल.
आधार क्रमांक देणे पूर्णपणे ऐच्छिक असून आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदार यादीतील त्याच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे . केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेमुळे विदयमान मतदाराचे नांव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. जर मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामूळे आधार क्रमांक सादर करता येत नसेल , तर मतदाराला नमूना अर्ज क्र. ६ ब मध्ये खाली नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी कोणत्याही एक दस्तावेज सादर करता येईल.
१. मनरेगा जॉब कार्ड, २. बँक / पोस्टाचे फोटो असलेले खाते पुस्तक, ३ . श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ४. चालक परवाना, ५. पैन कार्ड, ६. आरजीआय ने एनपीआर अंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड, ७. भारतीय पारपत्र, ८. फोटो संहित पेंशन कागदपत्र, ९ . केंद्र / राज्य सरकारने / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपनीने कर्मचान्यांसाठी जारी केलेले फोटो सहित सेवा ओळखपत्र, १०. संसद सदस्य विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य यांना जारी केलेले ओळखपत्र, ११ . भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने जारी केलेली विशेष ओळखपत्र यापैकी कोणत्याही एक दस्तावेज सादर करता येईल अशी माहिती तहसिलदार समीर यादव यांनी दिली.
तरी ०१ ऑगस्ट २०२२ पासून भारत निवडणूक आयोगाव्दारे लागू करण्यात आलेल्या मतदार ओळखपत्रास आधार जोडणीच्या कार्यक्रमात सर्व मतदारांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार समीर यादव यांनी केले.