जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा ध्वज वितरणाबरोबरच विविध कार्यक्रम संपन्न

 

 
        सातारा दि. 5 ( फलटण टुडे वृत्तसेवा ): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि.13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत आज जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कार्यक्रम संपन्न झाले.

 

            या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत जाधववाडी  व ग्रामपंचायत कोळकी ता. फलटण येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे व फलटणच्या गट विकास अधिकारी अमिता गावडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत   भुईंज ता. वाई व  वाकळवाडी ता. खटाव येथे ध्वज विक्री केंद्रामार्फत ग्रामस्थांना तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले.

 


            ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत नागठाणे ता.जि.सातारा येथे ग्रामपंचायतीचे ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन व  ग्रामस्थांना ध्वजाचे वितरण करणेत आले.       या प्रसंगी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत किरण सायमोते यांच्यासह  ग्रामस्थ उपस्थित होते.

 

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची उपक्रमाची जनजागृती व्हावी यासाठी ग्रामपंचायत आडळूपेठ ता. पाटण व  जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सातारा तालुक्यातील कामथी येथील न्यु इंग्शिस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 75 हजार बियाणांचे रोपन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!