फलटण दि.2 : ( फलटण टुडे वृत्तसेवा )
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संगणक व संगीत प्रशिक्षण शुभारंभ तसेच वर्गातील मंत्रिमंडळ यांचे मतदान शालेय मंत्रीमंडळासाठी आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी, सामाजिक, शैक्षणिक इ. भाषणाचे सादरीकरण केले यासठी पर्यवेक्षक म्हणून सौ. भंडलकर एस. आर. व सौ. सूर्यवंशी एस. जी. यांनी कामगाज पाहिले.
प्रथम क्रमांक ज्ञानदा मोरे. द्वितीय क्रमांक जानवी धनवडे, तृतीय क्रमांक शिवांजली संकपाळ यांना मा. फ. ए. सो. चे अधीक्षक मा. श्री श्रीकांत फडतरे साहेब व मा. श्री. मुख्याध्यक रुपेश शिंदे सर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व संगणक व संगीत सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा. श्री. अरविंद सखाराम निकम, फलटण एज्युकेशन सोसायटीचे अधीक्षक मा. श्री श्रीकांत बाबुराव फडतरे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर शाळा समितीचे चेअरमन मा.सौ वसुंधरा राजीव ना. निंबाळकर व्हाइ. चेअरमन मा. सौ. नूतन अजितसिह शिंदे. शाळा समितीचे सदस्य मा. शरद शिरीषकुमार दोशी, मा. श्री भोजराज विठ्ठल ना. निंबाळकर, मा.श्री अरविंद रुपचंद शहा मा. श्रीमती निर्मला सतीश रणवरे (नि. सदस्या) मा.श्री. रुपेश बबनराव शिंदे (मुख्याध्यक), शिक्षक प्रतिनिधी विभाग प्रमुख व सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.