बेरी कॅलीबट कंपनीकडून कटफळ शाळेला साहीत्य वाटप

बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा

सोमवार दि. 01 ऑगस्ट रोजी  कटफळ येथील जिल्हा परिषद शाळेला एमआयडीसी  परिसरातील बेरी कॅलीबट कंपनीकडून सीएसआर   मधुन साऊंड साहित्य , ग्रीनबोर्ड, प्रिंटर साहित्य , एल ई डी साहीत्य अशा प्रकारे शाळेला सुपूर्द करण्यात आले. यावेळी कंपनीकडून पुढे सीएसआर  माध्यमातून अनेक कामे केली जाणार आहेत व शाळेसाठी आवश्यक मदत केली जाणार आहे असे सांगीतले.
यावेळी कंपनीचे अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व शाळेच्या वतीने साहीत्य दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सरपंच पुनम किरण कांबळे , उपसरपंच सिमा सिताराम मदने , सदस्य संध्या मोरे , कंपनीचे अधिकारी राजेंद्र सोनंदकर , अमोल नाईक व शाळेचे मुख्याध्यापक अलका खलाटे व शाळेतील शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!