डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करताना पौर्णिमा तावरे, बिरजू मांढरे, प्रियांका मांढरे व इतर
बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
सोमवार 01 ऑगस्ट रोजी नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे साजरी करण्यात आली
या प्रसंगी मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मा.उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेते सचिन सातव नगरसेवक राजेंद्र बनकर,अनिता जगताप, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्यालयीन अधीक्षक हनुमंत पाटील,व विश्वास देवकाते, इम्तियाज शिकीलकर, भारत अहिवळे,आरती शेंडगे, प्रियंका मांढरे व इतर मान्यवर उपस्तित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
अण्णाभाऊ साठे यांचे विचार व लिखाण आजही प्रेरणादाई असल्याचे पौर्णिमा तावरे यांनी सांगितले
अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार होणे साठी पुस्तकालय व स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन सुरू केले असून सामाजिक बाधलीकी जपत समाजभूषण भाऊसो मांढरे मित्र मंडळ, साईच्छा सेवा ट्रस्ट व लहुजी वस्ताद दहीहंडी संघ यांच्या वतीने
वर्षभर विविध सामाजिक उपक्रम चालू असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले
धनंजय तेलंगे, किरण बोराडे, विजय तेलंगे, राजू मांढरे, निलेश जाधव व इतर सहकारी यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होणे साठी परिश्रम घेतले.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार सचिन मांढरे यांनी मानले.
र