जळोची : फलटण टुडे वृत्तसेवा
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील डॉ. अनिल डिसले यांनी डॉ. बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून भौतिकशास्त्र या विषयात पी एच डी पदवी मिळविली आहे.
डॉ. अनिल डिसले हे या महाविद्यालयात गेली २० वर्षापेक्षा अधिक काळ अध्ययन-अध्यापन करीत आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. . रा. स. बिचकर, तसेच विद्याप्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळ यांनी डॉ. श्री. अनिल डिसले यांचे अभिनंदन केले आहे .