वायदे बाजाराची ओळख या विषयी कार्यशाळा संपन्न

 

सातारा,दि.26:  कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा व नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपनी संचालक व शेतकरी  यांच्यासाठी वायदे बाजाराची ओळख या विषयी कार्यशाळा संपन्न झाली.

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील बळीराजा सभागृहात झालेल्या कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडचे उपव्यवस्थापक रोहन दांडे, इति बेदी, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक राजेंद्र चौधरी, बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ भुषण यादगीरवार, महेश बाबर, संग्राम पाटील, एस.बी. सकटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमाल उत्पादन करणे बरोबरच शेतमाल विक्री व्यवस्थापनेवर भर दिला पाहिजे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी NCDEX वायदे बाजारामध्ये सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी केले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजना मार्गदशन करुन नाबार्डचे महाप्रबंधक श्री. चौंधरी यांनी छोट्या शेतकऱ्यांचा व्यापार संघामार्फत राबविली जाणारी समभाग निधी योजना, दहा हजार शेतकरी उत्पादक कपंनी स्थापना, ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रकचर फंड, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनांचा लाभ शेतकरी उत्पादक कंपन्या कशा पद्धतीने घेवू शकतात या विषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.

या कार्यशाळेत कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडचे श्री. दांडे व श्रीमती बेदी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!