बारामती :
श्रायबर डायनामिक्स डेअरी एम्प्लॉईज युनियन चा 25 वर्धापन दिन रविवार 24 जुलै रोजी कंपनी मध्ये विविध उपक्रमांनी साजरा झाला.या प्रसंगी कर्मचारी
संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब थोरात
उपाध्यक्ष हनुमंत कोकरे, कार्याध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस गजानन भुजबळ, खजिनदार गणेश जगताप, सहचिटणीस तुळशीदास मोरे सहचिटणीस ओमकार दुबे,सह खजिनदार गुलाब पठाण व अधिकारी वर्ग उपस्तित होते.
कामगारांचे हित व कामगारांची सुरक्षा महत्वाचे असून नवीन युवा पिढी ने कंपनी च्या प्रगती मध्ये योगदान द्यावे सर्व जुन्या कर्मचारी वर्गाने कष्ट घेऊन कंपनीचा नाव लौकिक वाढवला आहे कंपनीचा उत्कर्ष होत असताना संघटना ची जवाबदारी सुद्धा वाढत आहे कर्मचाऱ्याचे हीत जोपासण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी सांगितले. आभार राजेंद्र काकडे यांनी मानले.
——————————-