सानिका मालुसरे हिची राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग सपर्धेसाठी निवड

राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग यश मिळाल्यावर सानिका मालुसरे व पंच


बारामती :
बारामती विद्या प्रतिष्ठान ची   सानिका राजेंद्र मालुसरे हिची राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग मध्ये दुसऱ्यांदा निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशन, सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, व मास्टर्स ,क्लासिक राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धा  मुंबई येथे 21 व 22 जुलै रोजी  झाली.
सानिका ही बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान येथे शिक्षण घेत असून ती सध्या ,पुणे स्पार्क जिम हडपसर येथे प्रशिक्षण  घेत आहे. महिला वजनगट ७६ किलो मध्ये हिने एकूण २८५ कीलो वजन उचलून प्रथम क्रमंlक मिळवला. या प्रसंगी पंच महेश विधाते, रवी गिंधले व राजेश तुपे व इतर मान्यवर उपस्तित होते. 
केरळ येथील होणाऱ्या नॅशनल पॉवरलिफ्टींग सर्धेमध्ये तिची निवड झाली आहे. 
तिच्या सातत्य पूर्वक यशाबद्दल  विरोधी पक्षनेते अजित पवार  यांच्या वतीने  संपूर्ण पॉवरलिफ्टींग सेट भेट दिला. 
या प्रसंगी अजित पवार यांचे कार्यालयीन प्रमुख हनुमंत पाटील माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव , जयश्री सातव , क्रीडा अधिकारी महेश  चावले व राजेंद्र मालुसरे, अविनाश भावसार आदी मान्यवर उपस्तित होते 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!