भागवत धर्माची पताका फडकावित भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पंढरपूर ते घुमान(पंजाब) अशी २१ दिवसांची सायकल वारी

फलटण दि. (प्रतिनिधी):-
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर  ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) २१ दिवसांची सायकल वारी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणारे तसेच भागवत धर्माची पताका अटकेपार फडकविणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दि . ४ नोव्हेंबर २०२२ ते संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दरम्यान गुरुवार  दि . २४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) अशी भागवत धर्माची पताका फडकावित तसेच भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी  २१  दिवसांची सायकल वारी  आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे सचिव डॉ अजय फुटाणे यांनी दिली .* 

महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ ,  संत नामदेव समाजोन्नती परिषद व श्री संत नामदेव समाज युवक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराजांचे वंशज ह भ प ज्ञानेश्वर महाराज नामदास , केशव महाराज नामदास , कृष्णदास महाराज नामदास , मुकुंद महाराज नामदास व माधव महाराज नामदास यांच्या आशीर्वादाने  या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे . श्री क्षेत्र पंढरपूर , फलटण , सासवड , पुणे , आळंदी , देहू , नाशिक , त्र्यंबकेश्वर मार्गे ही सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात , राजस्थान , हरियाणा , पंजाब या राज्यातून अमृतसर मार्गे घुमान असा  २१०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे . सोबत  संत नामदेव महाराज व गुरु गोविंदसिंह यांचा ग्रंथ , पादुका , भागवत धर्माची पताका व पालखी रथ असणार आहे . या सायकल वारीत  १८ ते ३० वयोगटातील स्त्री , पुरुष सायकल स्वारांना  सहभागी करुन घेतले जाणार आहे . या  सायकलस्वारांचा श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान पर्यंतचा चहा , नाष्टा , जेवण व निवास तसेच  सायकलस्वाराची  सायकल पंढरपूर पर्यंत गाडीने मोफत आणण्याचा सर्व खर्च संघटने मार्फत केला जाणार आहे  . मात्र घुमान ते पंढरपूर पर्यंतचा परतीचा रेल्वेचा प्रवास  सायकलस्वाराला स्वतः करावा लागणार आहे . 

या सायकल वारीत सहभागी होण्यासाठी सूर्यकांत भिसे ( वेळापूर ) ९८२२०२३५६४ , डॉ अजय फुटाणे ( पुणे ) ९४२२३६२५९५ , 
शंकर टेमघरे ( पुणे ) , ७९७२८५३८९५ , संजय नेवासकर ( पुणे ) ९८२२२८१५८८ , ॲड विलास काटे ( आळंदी ) , ९८२२८५४९५५ ,  रोहित यवतकर ( पुणे ) ९९७०००१०१० ,  सुनिल गुरव ( पंढरपूर ) ९७६७२५७३६७ , 
मनोज मांढरे ( सासवड )
9422303343 , सुभाष भांबुरे ( फलटण )९८२२४१४०३० , गणेश जामदार ( अकलूज ) ९७६७७९९५९५ , सिध्देश हिरवे ( शिक्रापूर )  ८०८७७६२७८२ व अनंत जवंजाळ ( वेळापूर ) ७४१०११०४०३ यांच्याशी ३० सप्टेंबर २०२२ पुर्वी  संपर्क साधून नांव नोंदणी करावी . नाव नोंदणी करताना ग्रामपंचायत किंवा पोलिस ठाण्याचा वर्तुनुकीचा दाखला , ओळखपत्राची झेरॉक्स , दोन आयडेंटि साईज फोटो ,  शासकीय किंवा खाजगी रुग्णालयाचे फिटनेस सर्टिफिकेट , कोरोनाचा बुस्टर डोस घेतलेले सर्टिफिकेट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .
या सायकल वारीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदी , श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू , श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर , श्री संत सोपानदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र सासवड , श्री संत मुक्ताबाई महाराज संस्थान श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर , श्री संत नामदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर व श्री संत एकनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र पैठण यांचे सहकार्य लाभणार असल्याचे भिसे यांनी सांगितले .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!