व्यवसाय शिक्षणासाठी ( बायफोकल अभ्यासक्रम ) प्रवेश सुरु
सातारा, दि.25 : इयत्ता 11 वी साठी आपली शाखा ठरल्यांनतर आवश्यक ते बायफोकल अभ्यासक्रम निवडणे हे उत्तम भविष्याचा मार्ग आहे. एक भाषा व एक वैकल्पिक ( Optional ) विषय याच्या ऐवजी आपण हा विषय निवडू शकतो म्हणजे सायन्सला प्रवेश घेतले नंतर मराठी/हिंदी व बायालॉजी/भुगोल या दोन विषया ऐवजी आपण बायफोकल विषय निवडू शकतो.
या वर्षी पासुन 12 वी चे गुण व सी ई टी मध्ये मिळालेले गुण हे समप्रमाणात ( 50 टक्के ) पुढील इंजिनिअरिंग अथवा अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे नुकतेच शासनाने जाहीर केलेले आहे. बायफोकल अभ्यासक्रमां मध्ये मिळणारे गुण इतर विषयांच्या तुलनेत खुपच जास्त असतात कारण या विषयांमध्ये प्रात्यक्षिकांवर 50 टक्के किंवा त्याहुन जास्त भर दिलेला आहे. विदयार्थी पैंकी च्या पैंकी गुण मिळवु शकतात या मुळे गुणांची टक्केवारी वाढण्यास मदत होते.
तांत्रिक शिक्षणासाठी द्रिलक्षी अभ्यासक्रमातील विषय अत्यंत उपयुक्त आहेत. शासकीय तांत्रिक विदयालय सातारा येथे या द्रिलक्षी अभ्यासक्रमामध्ये मेकॅनिकल मेंन्टेनन्स, इलेक्ट्रीकल मेंन्टेनन्स, स्कुटर व मोटर सायकल सर्व्हिसिंग, जनरल सिंव्हील इंजिनियरिंग हे अभ्यासक्रम प्रती वर्ष 1200/- (अक्षरी एक हजार दोनशे फक्त ) इतक्या अत्यल्प शुल्कांमध्ये शिकविले जातात. एका अभ्यासक्रमासाठी विदयार्थी प्रवेश क्षमता 50 इतकी आहे. चार अभ्यासक्रमास एकुण प्रवेश क्षमता 200 इतकी आहे. या अभ्यासक्रमासाठी सदयस्थिती मध्ये यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स सातारा, भवानी विदयामंदिर सातारा, छत्रपती शाहु ॲकॅडमी सातारा या महाविदयालया मधील विदयार्थी आठवडयातील दोन दिवस या संस्थेमध्ये बायफोकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरिता येतात. या संस्थेशी संलग्नता मिळविण्यासाठी खाजगी महाविदयालय संस्थेशी संपर्क साधून रितसर मान्यता घेवू शकतात. परिक्षेत जास्त गुण मिळविणे व पुढील तांत्रिक शिक्षणासाठी पाया पक्का करणे हे दोन उद्देश साध्य करणारे हे अभ्यासक्रम आहेत.
तरी आपला प्रवेश निश्चीत करण्यासाठी वरील पैंकी एका महाविदयालयामध्ये सायन्सला प्रवेश घेवून बायफोकल अभ्यासक्रमाची मागणी करा. अधिक माहितीसाठी शासकीय तांत्रिक विदयालय, शाहु स्टेडियम समोर सातारा. येथे संपर्क साधावा तसेच 9921957978, 8999866469, 9881048336 9765800060या भ्रमणध्वनी क्रमाकांवरतीही संपर्क साधावा