सातारा :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 60 वा हिरक महोत्सव वर्धापन दिन शुक्रवार दिनांक 22 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा – फलटण आयोजित वर्धापन दिन महात्मा शिक्षण संस्था संचलित, मूकबधिर विद्यालय फलटण (ठाकुरकी ) येथे भा.वा.शिंपी गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा केला.
तसेच फलटण तालुक्यातील बहुतांश शिक्षकांनी आपल्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप करून व शालेय परिसरात वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा केला. प्रथमता आदरणीय भा.वा.शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.फलटण तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस गणेश तांबे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा इतिहास सर्वांसमोर स्पष्ट केला.
आभार राजेंद्र सर यांनी मानले स्वागत संदीप कोळेकर सर यांनी केले सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्रकुमार घाडगे यांनी आपल्या मनोगतात मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असे सांगून आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केल्याबद्दल सर्व शिक्षक समितीच्या शिलेदारांचे आभार व्यक्त केले.
फलटण तालुका शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष राजेंद्रप्रसाद निकाळजे यांनी आपल्या मनोगतात या विद्यालयासाठी अन्नदान करण्याचे जाहीर केले. तसेच सुरेंद्रकुमार घाडगे यांनीही आर्थिक मदत देऊ केली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांची सर्वांसमोर माहिती दिली.
कार्यक्रमा प्रसंगी सातारा जिल्हा शिक्षक समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्रकुमार घाडगे सातारा जिल्हा महिला आघाडी प्रमुख करुणा मोहिते ज्येष्ठ मार्गदर्शक सुभेदार डुबलसर शिक्षक नेते तथा जिल्हा सहसंपर्क प्रमुख धन्यकुमार तारळकर शिक्षक बँकेचे माजी व्हॉईस चेअरमन सोमनाथ लोखंडे शिक्षक समितीचे माजी उपाध्यक्ष संतोष मोहिते कोषाध्यक्ष राजेंद्रप्रसाद निकाळजे कार्याध्यक्ष नितीन करे शिक्षक समितीचे युवा नेतृत्व राजेंद्र सरक व युवा नेते संदीप कोळेकर उपस्थित होते त्याचबरोबर विद्यालयाच्या प्राचार्य तृप्ती देसाई शिक्षक वृंद उदय निकम वैशाली शिंदे
विजया मठपती शशिकला विरकर मनीषा चोरमले
नितेश शिंदे तसेच सर्व विद्यार्थी मित्र उपस्थित होते.