रक्तदान ही चळवळ हवी :आमदार सुनील शेळके


अजित दादा युथ फौंडेशन चे भव्य रक्तदान शिबीर संपन्न 


रक्तदान शिबिरा प्रसंगी आमदार सुनील शेळके, निलेश लंके व  सोमनाथ गायकवाड व इतर मान्यवर


बारामती :
  हिंदुत्वापेक्षा देशाला समतेची व बंधुत्वाची आवश्यकता आहे रक्तदान माध्यमातून  ऐक्य निर्माण होते व रुग्णाची गरज भागते  त्यासाठी देशात  रक्तदान हि चळवळ होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मावळ चे  आमदार सुनील शेळके यांनी केले 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा युथ फौंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सुनील शेळके बोलत होते 
या प्रसंगी  पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके, पुणे शहर राष्ट्रवादी  महिला उपाध्यक्षा स्वाती चिटणीस, जेजुरी नगरपरिषद चे नगरसेवक गणेश जगताप, दीपक जाधव व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष 
संभाजी होळकर, बारामती बँक अध्यक्ष सचिन सातव, प्रताप पागळे व   अजित दादा युथ फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, उपाध्यक्ष दत्ता माने, राहुल चौधर, सचिव सचिन घाडगे, खजिनदार अरविंद काळे, कार्याध्यक्ष ओंकार महाडिक व इतर उपस्तित होते 
देशाच्या राजकीय पंढरीत येऊन रक्तदान सारख्या महान कार्यास शुभेच्छा देता येतात हे पुण्यवान पणाचे लक्षण असून अजित दादा युथ फौंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले 
रक्तदान बरोबर वृक्षारोपण, वन्य जीवासाठी पाणवठे तयार करून पाणी सोडणे व कोरोना काळात किराणा, मास्क, सॅनिटायझर वाटप केल्याचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले 
स्वाती चिटणीस, संभाजी होळकर यांनी मनोगत व्यक्त केली 
गुणवंत रक्तदात्याचा सन्मान या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला 
या शिबिरामध्ये 2967 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले  फोन केल्यावर रक्तदानासाठी वर्षभर उपलब्ध रक्तदात्याचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला 
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले आभार राहुल चौधर यांनी मानले 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!