बारामती :
दि. 21 जुलै रोजी अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल,कटफळ येथे विद्यार्थी पदवी प्रदान सोहळा घेण्यात आला, यावेळी विद्यार्थ्यांनी पदवी घेताना आवश्यक असलेला पोशाख परिधान करून पदवी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. त्यावेळी शाळेमध्ये विविध कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पुष्पवृष्टी करत मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सद्गुरूश्री. वामनराव पै. व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात स्वागत गीत गायन करून मान्यवरांचे स्वागत केले, व त्यानंतर पुढील कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये गीत- गायन, नृत्य, वक्तृत्व अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून शाळेविषयी आपुलकी व प्रेम दिसून आले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव सौ. संगिता (काकी) मोकाशी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री राऊत सर लाभले. तसेच शाळेचे मुख्यध्यापक श्री. प्रशांत वणवे सर व उपमुख्याध्यापक श्री. प्रकाश गोफने सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. गीता भंडलकर, सौ. वृषाली शेळके व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी शुभ्रा घोरपडे व दिव्या निलटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. किशोर शिंदे सर यांनी केले.