उद्योजकाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत : डॉ अनिल बागल

उद्योजकाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत : डॉ अनिल बागल 

‘बिमा’ च्या वतीने जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना वह्या वाटप 

प्रातिनिधिक स्वरूपात वह्या  डॉ  बागल यांच्या कडे सुपूर्द करताना भारत फोर्ज चे  सदाशिव पाटील व धनंजय जामदार व इतर
बारामती : 
 बारामती एमआयडीसी मधील विविध उदयोजक व उद्योग क्षेत्रांनी जिल्हा परिषद शाळेसाठी केलेली मदत आदर्शवत असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती चे गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल यांनी केले 
 बारामती  इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन च्या (बिमा )  वतीने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  जिल्हा परिषद मधील शालेय विद्यार्थ्यांना वीस हजार  वह्यांचे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात डॉ अनिल बागल बोलत होते या प्रसंगी गटशिक्षण अधिकारी संपत गावडे, बिमा चे अध्यक्ष धनंजय जामदार व शरद सूर्यवंशी, मनोहर गावडे, महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, हरीश कुंभरकर, संभाजी माने,मनोहर गावडे,अंबीरशाह शेख 
व भारत फोर्ज चे एच आर मॅनेजर सदाशिव पाटील, श्रायबर डायनॅमिकस चे प्लॅन्ट हेड हनुमंत जगताप,रियल डेअरी चे सुशांत शिर्के, एस एफ एस फायर चे नितीन जामदार, पियाजो व्हेइकल्स चे किरण चौधरी आदी मान्यवर उपस्तित होते 
विद्यार्थ्यांना गुणवत्ता व दर्जात्मक शिक्षण देत असताना उद्योजकांनी केलेले कार्य सहकार्य स्फूर्ती देईल असेही डॉ  अनिल बागल यांनी सांगितले 
उद्योजकांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे गटशिक्षण अधिकारी संपत गावडे यांनी सांगितले 
बिमा च्या विविध कार्याची माहिती देऊन सर्व कंपन्यांच्या साह्याने वह्या वाटप करत असल्याचे बिमा चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले
वीस हजार वह्या गटविकास अधिकारी  डॉ बागल यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले 
आभार शरद सूर्यवंशी यांनी मानले 

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!