भाग्यश्री कुलकर्णी यांना पीएच. डी. प्रदान

भाग्यश्री कुलकर्णी
बारामती :
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील *इंग्रजीच्या सहाय्यक प्राध्यापिका भाग्यश्री कुलकर्णी यांनी* नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची *पीएच. डी. ही पदवी* प्राप्त केली. कॅरिबियन लेखिका जीन र्‍हाइज यांच्या कादंबरीतील स्त्रीवादी पात्रांचा त्यांनी चिकित्सक अभ्यास करून आपला प्रबंध सादर केला. 

प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण येथील *डॉ. एस. सी. व्यवहारे* मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही पदवी प्राप्त केली. तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील *प्रा. डॉ. अक्षय सरवदे यांनी* बहिस्थः परीक्षक म्हणून काम पाहिले. तर *डॉ. प्रशांत अमृतकर* यांनी चेअरमन म्हणून काम पाहिले. 

डॉ भाग्यश्री कुलकर्णी या गेली 16 वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी तु.च.महविद्यलय येथे पाच वर्षे माळेगांव येथील इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये सहा वर्षे तर विद्या प्रतिष्ठान संस्थेत गेली पाच वर्षे इंग्रजीचे अध्यापन करीत आहेत. त्यांचे सात शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या यशात त्यांचे पती श्री. दुर्गाप्रसाद कुलकर्णी आणि सर्व कुटुंबीय यांचा मोलाचा वाटा आहे. 

त्यांचे परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळेच हे यश त्यांनी संपादन केले आहे अशी भावना सर्व स्तरांवर उमटली आहे. 

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व घटक, संस्थाचालक, प्राचार्य डॉ. भरत शिंदे, , उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे आणि डॉ. लालासाहेब काशिद, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय खिलारे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांच्यामार्फत हार्दिक अभिनंदन केले जात आहे.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!