कटफळ ग्रामपंच्यात च्या वतीने सन्मान करताना पदाधिकारी
बारामती :
तालुक्यातील कटफळ ग्रामपंच्यात च्या वतीने इयत्ता दहावी व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सरपंच पुनम किरण कांबळे , उपसरपंच सिमा सिताराम मदने, सदस्य डाॅ.संजय मोकाशी, संग्रामसिंह मोकाशी , तात्याराम रांधवण, विजय कांबळे , संध्याराणी झगडे , संध्या मोरे व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.देशाचे उज्जवल
भविष्य घडविणारे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा मधील अधिकारी व उत्तम प्रशासकीय सेवा बजावलेले सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान म्हणजे आदर्शाचा सन्मान असल्याचे सरपंच पूनम कांबळे यांनी सांगितले