राज्यात बारामतीच्या जय जवान माजी सैनिक संघटनेचे कार्य आदर्शवत- उपमुख्यमंत्री अजित पवार

आजी माजी सैनिक संघटनेचे पुस्तक प्रकाशन करताना अजित पवार व इतर मान्यवर

बारामती:
राज्यात बारामती मधील  जय जवान माजी सैनिक संघटनेचे सामाजिक कार्य मोठे आहे. या सैनिकांच्या कार्याविषयीची पुस्तिका प्रकाशित होत आहे. हे पाहून खूप आनंद झाला. अनेक युवकांनी आजवर आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सैन्य दलात महाराष्ट्राची मान उंचविली आहे. आजी-माजी सैनिकांची कामगिरी पुढे यायला हवी, त्यामुळे लोकप्रबोधन होईल व सैनिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाईल, यासाठी माजी सैनिक संघटनेने तयार केलेली कार्य़पुस्तिका निश्चित मोलाची भूमिका बजावले, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
मुंबई येथील देवगिरी निवास्थानी पवार यांच्या हस्ते बारामती मधील माजी सैनिक संघटनेने तयार केलेल्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, पुस्तिकेचे लेखक व संघटनेचे विश्वस्त अभय थोरात, कल्याण पाचांगणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.  दरम्यान, माजी सैनिक संघटनेने बारामतीमध्ये रक्तदान शिबीरासह शैक्षणिक स्तरावरील उपक्रम यशस्वीपणे राबविल्याची नोंद आहे.
याशिवाय महिला बचत गटांना रोजगार मिळवून देणे, पुरग्रस्तांना मदत करणे, स्वयंरोजगार उभारण्यासाठी युवकांना मार्गदर्शन करणे, शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडविणे, कारगील विजय दिवस साजरा करणे, कोरोनाच्या निर्बंदकाळात पोलिसांबरोबर माजी सैनिकांचे सुरक्षितेतेच्या दृष्टीने योगदान खूप महत्वपुर्ण ठरले आहे. त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, विश्वस्त राहुल भोईटे, भारत जाधव, नामदेव सायार, शिवाजी साळुंके, गणपत फडतरे, रविंद्र लडकत, श्रीमती शोभा घाडगे, रमेश रणमोडे, शिवलिंग माळी, भारत मोरे, श्रीमती वैशाली मोरे, विलास कांबळे, अभय थोरात, पोपट निकम, शिवाजी साळुंखे, विक्रम जगताप,संदीप रणमोडे,मधुकर बोरावके (कायदेशीर सल्लागार)पुस्तक मुखपृष्ठ व अंतर्गत सजावट कार 
संदिप रणमोडे व अमीर थोरात
व श्री डाँ श्रीराम यशवंत गडकर आदी नि विशेष योगदान दिले आहे.
राज्यात प्रथमतः माजी सैनिकांना घरपट्टी  माफी करण्याबत संघटनेणे पाठपुरावा केला बारामती नगरपरिषद  ने माफी केल्यावर राज्यात आघाडी शासनाने घरपट्टी माफ केली याचे श्रेय अजित पवार यांना जाते असेही संघटनांचे  अध्यक्ष हनुमंत निबाळकर यांनी सांगितले 

चौकट 
सैनिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन….!
देश सेवेसाठी आजी – माजी सैनिक देत असलेले योगदान जनता कदापीही विसरणार आहे. विशेषतः माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांपुढे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कठिबद्ध आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील जय जवान माजी सैनिक संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!